Mahindra BE 6e : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कार कंपन्या बजेट आणि प्रवास करताना सुरक्षित फीचर्स लक्षात घेऊन नवनवीन मॉडेल्स बाजारात घेऊन येत असतात. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्राने एक नाही, तर दोन नवीन इलेक्ट्रिक कार बीई ६ई (BE 6e) आणि एक्सईव्ही ९ई (XEV 9e) लाँच केल्या आहेत. तर या नवीन लाँच झालेल्या एसयूव्हीच्या डिझाईन, बॅटरी, रेंज, फीचर्स, ॲक्सलरेशन, किमतीबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

अल्ट्रा-फास्ट 6th जनरेशन Adreno GPU, २४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज, MAIA ब्लूटूथ ५.२ आणि वाय-फाय ६.०, कनेक्टिव्हिटी व रिअल-टाइम अपडेट्स सक्षम करणारे Quectel 5G आहे. Mahindra BE 6e मध्ये ADAS L2+ आहे जे Mobileye EyeQTM6 चिपद्वारे समर्थित आहे. त्यात २ जीबी रॅम आणि ८ एमपी कॅमेरा, युजर्स मनोरंजन, संगीत, पॉडकास्ट, ओटीटी चित्रपट, खरेदी व प्रॉडक्टिव्हिटी यांमधील ६० प्लस ॲप्समध्ये प्रवेश घेऊ शकता येईल.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या

कॉकपिट एक्स्पिरियन्स (Cockpit experience) :

Mahindra BE 6e ला इन्फोटेन्मेंट आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी ड्युअल स्क्रीन दिली आहे. युजर्स डॉल्बी ॲटमॉससह १६ स्पीकर हर्मन कार्डन साऊंड सिस्टीम, लार्ज इन्फिनिटी रूफ, मागे बसणारे प्रवासी पुढील सीटच्या मागील बाजूस प्रदान केलेल्या कारमधील इन्फोटेन्मेंट स्क्रीनसह प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

सेफ्टी किट (Safety kit) :

Mahindra BE 6e मध्ये सेफ्टी किट उपलब्ध आहेत. त्यामध्ये ADAS लेव्हल २ + सिस्टीम ५ radars आणि १ व्हिजन कॅमेरा असणार आहे. एसयूव्हीमध्ये बसून तुम्ही रस्त्यावरून जाणारी माणसे, प्राणी, बॅरिकेड्स व विविध प्रकारची वाहने डिटेक्ट करू शकता. ड्रायव्हर थकला आहे का हे ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टीम (DOMS)द्वारे समजले जाऊ शकते. DOMS साठी वापरण्यात आलेला कॅमेरा सेल्फी किंवा व्हिडीओ कॉल्स करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. BE 6e मध्ये ३६०° सराउंड व्ह्यू मॉनिटर सिस्टीमदेखील मिळते. आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे ऑटो पार्क प्रणाली जी 12 अल्ट्रासोनिक सेन्सर आहे.

हेही वाचा…Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल

परफॉर्मन्स आणि रेंज (Performance, range) :

कंपनीच्या माहितीनुसार Mahindra BE 6e कार INGLO इंडस्ट्रीच्या वजनानं सर्वांत हलक्या फ्लॅट फ्लोअर स्केटबोर्ड स्ट्रक्चर कार असून, त्यांना हाय डेन्सिटी बॅटरी तंत्रज्ञानाशी जोडण्यात आलं आहे. दोन्ही कारमध्ये कॉम्पॅक्ट थ्री इन वन २१० केडब्ल्यू (210 kW) २८५ पीएस (285 PS) मॅक्स पॉवरट्रेन सिस्टीम देण्यात येणार असून, मोटर इन्व्हर्टर आणि ट्रान्स्मिशनपासून ते तयार करण्यात आलं आहे. ७९ केडब्ल्यूएच एलपीएफ (79 kWh LFP) बॅटरी पॅकसह रेंज ६८२ किमी (MIDC P1+P2) आहे. ६.७ सेकंदांत ० ते १०० किमी/तास वेग आहे. तसेच ग्राहक दररोज रेंज, शर्यतीच्या ड्राइव्ह मोडमधून एखादा पर्याय निवडू शकतात. BE 6e मध्ये १७५ केडब्ल्यू (175-kW) फास्ट चार्जर असणार आहे; ज्यामुळे २० मिनिटांत २० ते ८० टक्क्यांपर्यंत सहजपणे चार्ज करता येईल.

लाइफटाईम बॅटरी वॉरंटी (Lifetime battery warranty) :

BE 6e खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बॅटरी बदलण्याची किंवा बॅटरीच्या खर्चाची काळजी घेण्याची गरज नाही. कारण- महिंद्रा कंपनी पहिल्यांदा रजिस्टर करणाऱ्या मालकांसाठी (खासगी नोंदणी) लाईफटाईम बॅटरी वॉरंटी देत ​​आहे.

वाहनाची पुनर्विक्री केली गेली तरीही ते खरेदी करणाऱ्या पुढील मालकही १० वर्षांपर्यंत दोन लाख रुपये किमतीच्या स्टॅण्डर्ड बॅटरी वॉरंटीचा आनंद घेऊ शकतात. तसेच BE 6e सह कोणती सबस्क्रिप्शन-बेस मालकी योजना ऑफर केली जाते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

बीई ६ई किंमत (BE 6e Price )

महिंद्रा BE 6e ची किंमत १९.९० लाख रुपयांपासून सुरू होते आहे.

Story img Loader