अमरनाथ यांत्रेकरुंसाठी खुशखबर आहे. श्री अमरनाथच्या पवित्र गुंहेपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. यातच खेड्यातील रस्त्यापासून शहराच्या एक्सप्रेसवेपर्यंत जादू पसरवणारी महिंद्रा बोलेरो आता अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचणारे पहिले वाहन ठरले आहे. एक एसयूव्ही म्हणून, महिंद्रा बोलेरो, जी यशस्वीपणे उंचावर पोहोचली आहे, तिच्या खडतर राइडिंगसाठी देखील ओळखली जाते. भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO त्यांच्या बीकन प्रकल्पांतर्गत काश्मीरमधील लिडर व्हॅलीच्या बर्फाच्छादित हिमालयात असलेल्या अमरनाथ गुहा मंदिरापर्यंतचा रस्ता रुंदीकरणावर काम करत आहे.

देशाच्या सीमावर्ती भागात रस्ते बांधणीची जबाबदारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या खांद्यावर आहे. BRO केवळ रस्ते बनवत नाही तर रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारीही पार पाडते. सध्या ही संघटना २१ राज्ये, १ केंद्रशासित प्रदेश आणि अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार आणि श्रीलंका या शेजारील देशांमध्ये कार्यरत आहे. सीमा रस्ते जोडणीसाठी, ते पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ठेवण्यात आले आहे.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास

(हे ही वाचा: सणासुदीच्या ३० दिवसात ३.११ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; घेण्यासाठी शोरूम्समध्ये उसळली गर्दी)

 देशातील लहान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात महिंद्रा बोलेरो ही सर्वाधिक विकली जाते. महिंद्रा अँड महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही म्हणजे बोलेरो. टिकाऊपणा आणि मायलेजमुळे खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये याला मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही या चारचाकीची क्रेझ आहे.ओबडधोबड रस्ता असो वा गुळगुळीत महामार्ग, सर्वच रस्त्यावर बोलेरोचं अधिराज्य चालतं. 

आणखी वाचा >> अमरनाथ यात्रा आता वाहनाने करणे कसे शक्य झाले? काय आहे नितीन गडकरी यांचा प्रकल्प?

दणकट, दमदार अन् परवडणारी SUV आता बोलेरोचेच मॉर्डन व्हर्जन भारतीय बाजारात सादर करण्यात आलं आहे. महिंद्रा बोलेरो या कारची सुरुवातीची किंमत ९.२० लाख रुपये इतकी आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १०.१६ लाख रुपये इतकी आहे.