Mahindra Bolero: भारतात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वाहनांची सुरुवात झाली. हा तो काळ होता जेव्हा भारतीय कार मार्केट खूप वेगाने वाढत होते. यादरम्यान देशात इतिहास रचणारी अनेक वाहने लाँच करण्यात आली. २२ वर्षांनंतरही काही वाहनांची विक्री सुरू आहे. भारतीय कार निर्मात्याकडून येणारी महिंद्रा बोलेरो ही देखील अशीच एक एसयूव्ही आहे, जी आजही बाजारात वर्चस्व गाजवत आहे. ही त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी रफ एंड टफ एसयूव्ही आहे. देशातील ग्रामीण भागाबरोबरच शहरांमध्येही याला खूप पसंती दिली जाते.
महिंद्रा बोलेरोच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, जानेवारी २०२३ मध्ये SUV सुमारे ९,००० लोकांनी बुक केली होती. हे अजूनही महिंद्राच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. त्याची बॉक्सी डिझाईन, उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि शक्तिशाली इंजिन खराब रस्त्यांवरही चांगली कामगिरी करणारी एसयूव्ही बनवते. याशिवाय बोलेरोमध्ये सात ते आठ जण बसू शकतील एवढी जागा आहे.
(हे ही वाचा : ९.३३ लाखांच्या ‘या’ ७ सीटर एसयूव्हीनं Toyota Innova अन् Ertiga ला पछाडलं, ग्राहकांकडून बंपर खरेदी )
बोलेरोचे इंजिन पॉवरफुल
सध्याच्या महिंद्रा बोलेरोची किंमत मॉडेलनुसार ११.३९ लाख ते १२.७१ लाख दरम्यान आहे. महिंद्राने नुकतीच BS6- बोलेरो फेसलिफ्ट भारतात लाँच केली आहे ज्याची किंमत ९.४७ लाख (एक्स-शोरूम, मुंबई) पासून सुरू आहे. हे मॉडेल B4, B6 आणि B6 (O) सह तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. बोलेरो फेसलिफ्टमध्ये अतिशय शक्तिशाली १.५-लिटर mHawk75 डिझेल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन ३,६००rpm वर ७५bhp पॉवर आणि १,६००-२,२००rpm वर २१०Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
वैशिष्ट्ये
नवीन बोलेरोच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल एसी, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ संगीत प्रणाली, पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. बोलेरो भारतीय बाजारपेठेतील निसान मॅग्नाइट, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, किया सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीशी स्पर्धा करते.