महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एसयूव्ही सेंगमेंटमध्ये मोठा दबदबा पाहायला मिळतो. या कंपनीच्या कारची विक्रीही जोरात होत असते. महिंद्राच्या एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते. त्यामुळेच त्यांच्या विक्रीत तेजी दिसून येते. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, महिंद्राच्या लोकप्रिय कारच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
XUV300 कारच्या विक्रीत घट
महिंद्राच्या XUV300 या एसयूव्ही कारची विक्री डिसेंबर २०२३ मध्ये कमी झाली आहे. XUV300 च्या विक्रीने वर्ष-दर-वर्ष आणि महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर विक्रीत घट नोंदवली आहे. वार्षिक आधारावर XUV300 च्या विक्रीत २६.८ टक्के घट झाली आहे. इतकेच नाही तर महिन्या-दर-महिन्यानुसार XUV300 च्या विक्रीतही घट झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ४,८५० युनिट्सची विक्री झाली, जी डिसेंबर २०२३ मध्ये ३,५५० युनिट्सवर आली.
(हे ही वाचा : Tata Punch समोर तगडं आव्हान, Renault ची ५ सीटर कार नव्या अवतारात देशात दाखल, किंमत ५.९९ लाख )
XUV300 मध्ये काय आहे खास?
XUV300 ही महिंद्राची सर्वात स्वस्त आणि छोटी एसयूव्ही आहे. W2, W4, W6, W8 आणि W8 (O) या पाच ट्रिममध्ये येत असलेल्या या SUV ची किंमत रु. ७.९९ लाख ते रु. १४.७६ लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या एक्सयूव्हीमध्ये पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो, फ्रंट अँटिब्रेकिंग सिस्टीम, ड्रायव्हर आणि पॅसेंजर प्रवासी बॅग्ज दिल्या आहेत. यासोबतच या मॉडेलमध्ये फ्रंट अलॉय व्हील आणि मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील मिळेल.
कंपनीने ही एक्सयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायांसह सादर केली आहे. यात कंपनीने १४९७ CC चं डिझेल इंजिन आणि ११९७ CC पेट्रोल इंजिन उपलब्ध करुन दिलं आहे. तसंच या इंजिनसह मॅन्युअली ट्रान्समिशनही मिळेल. मायलेजचा विचार केला, तर ही एक्सयूव्ही १७ ते २० kmpl मायलेज देते.
यात अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो एसी, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, सिंगल-पेन सनरूफ (W4 व्हेरियंटमधून उपलब्ध), ७ एअरबॅग्ज, EBD सह ABS, ऑल-व्हील यांचा समावेश आहे. डिस्क ब्रेक, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल आणि फ्रंट/रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी ड्राइव्ह वैशिष्ट्ये येतात.