Mahindra Car Discount Offer: तुम्हाला नवीन महिंद्रा कार घ्यायची असेल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण, भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने त्यांच्या काही एसयूव्ही मॉडेल्सवर डिस्काउंट जाहीर केला आहे. कंपनी आपल्या थारसह अनेक वाहनांवर भरघोस सूट देत आहे, महिंद्रा कंपनी (मार्च २०२३) या महिन्यात, ग्राहकांना रोख सवलतींपासून ते थार 4WD, बोलेरो, बोलेरो निओ, Marazzo आणि XUV300 वर अनेक प्रकारच्या ऑफर देत आहे. चला, तुमच्या आवडत्या वाहनावर किती सवलत आहे जाणून घेऊया. तथापि, Scorpio N, Scorpio Classic, Thar 2WD, XUV400 EV आणि XUV700 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर कंपनी कोणतीही सूट देत नाही.

या सवलती सध्याच्या MY2023 मॉडेल्सवर तसेच MY2022 न विकल्या गेलेल्या स्टॉकवर उपलब्ध आहेत आणि महिंद्राच्या ग्राहकांना त्यांच्या वाहनांसाठी ब्रँडेड अॅक्सेसरीज मिळवण्याची संधी देईल.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

Mahindra Bolero

४५,००० रुपयांपर्यंत रोख सवलत; १५,००० रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज

महिंद्रा बोलेरोच्या सर्व प्रकारांवर २२,००० रुपयांपासून ते ६०,००० रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. टॉप-स्पेक बोलेरो B6(O) ला सर्वाधिक रोख ४५,००० रुपये आणि १५,००० रुपयांच्या अॅक्सेसरीजवर सूट मिळते.

(हे ही वाचा : Scorpio नाहीतर महिंद्राच्या ‘या’ सर्वात स्वस्त एसयूव्हीच्या मागे लागले भारतीय, झाली दणादण विक्री )

Mahindra Bolero Neo

जर तुम्हाला हे वाहन घ्यायचे असेल, तर कंपनी तुम्हाला ३७,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, १२,००० रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज डिस्काउंट देत आहे. बोलेरो निओमध्ये १.५-लिटर डिझेल इंजिन आहे, जे सब-४m वाहनाला १००hp पॉवर निर्माण करते. महिंद्रा सर्व प्रकारांमध्ये १२,००० रुपयांपर्यंत किमतीच्या ऍक्सेसरीज ऑफर करत आहे, तर बोलेरो निओवर १०,००० (बोलेरो निओ N4) आणि १८,००० (बोलेरो निओ N8) ते रु. ३७,००० (बोलेरो निओ N10R, N1) पर्यंत रोख सूट दिली जात आहे.

Mahindra Thar 4WD

कंपनी Mahindra Thar 4WD म्हणजेच Thar 4×4 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. Thar 4WD ला पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांवर ६०,००० रुपयांची मोफत अॅक्सेसरीज ऑफर मिळत आहे.

Mahindra XUV300

महिंद्रा XUV300 च्या खरेदीवर २२,००० रुपयांची सूट आणि १०,००० रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. W4 प्रकारावर ५,000 रुपयांच्या रोख सवलतीने ही ऑफर सुरू होते. टॉप-ऑफ-द-लाइन W8 सनरूफ व्हेरियंटला २२,००० रुपयांची रोख सूट आणि १०,००० रुपयांच्या अतिरिक्त मोफत अॅक्सेसरीज मिळतात. XUV300 TurboSport वर १०,००० रुपयांच्या अॅक्सेसरीजसह १०,००० रुपयांपर्यंत रोख सूट मिळत आहे.

(हे ही वाचा : स्वप्न करा पूर्ण! १०.८४ लाखाची सर्वाधिक विकली जाणारी कार आणा ४ लाखात घरी, ‘असा’ घ्या फायदा )

Mahindra Marazzo

महिंद्रा Marazzo MPV वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. त्याच्या M2+ आणि M4+ व्हेरियंटवर रु. २७,००० रुपयांची रोख सूट मिळते. तथापि, टॉप-ऑफ-द-लाइन M6+ वर फक्त २०,००० रुपयांची सूट मिळते. Marazzo सध्या फक्त डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे, जे १२०hp पॉवर जनरेट करते.

Story img Loader