Mahindra Diwali Sale : दिवाळी आली की कार कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन डिस्काउंट ऑफर्स आणि डील्स आणतात. यामध्ये आता महिंद्रा कंपनी सुद्धा सहभाग घेताना दिसून येते. या वर्षी महिंद्रा काही निवडक एसयुव्ही २०२३-२४ च्या मॉडेल्सवर चांगली सूट देणार आहे.

महिंद्रा एसयुव्ही दिवाळी डिस्काउंट ऑफर्स आणि डील्स (Mahindra SUV Diwali Discount & Deals 2024)

महिंद्राच्या एसयुव्हीवर ४.४ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत

sai tamhankar
सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “३ तारखेला…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
solar projects ajit pawar
सौर ऊर्जा प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
mahakumbh 2025 Guidlines
Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; चेंगराचेंगरीनंतर सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे!
mahakumbh mela 2025 viral video
Mahakumbh 2025 : प्रेयसीचा एक सल्ला अन् महाकुंभ मेळ्यात प्रियकर झाला मालामाल, एक रुपया खर्च न करता रोज कमातोय हजारो रुपये; पाहा VIDEO
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
Subhash Ghai
प्रसिद्ध दिग्दर्शकाने विकलं मुंबईतील घर; ८.७२ कोटीला घेतलेलं, आता मिळाले ‘इतके’ कोटी
first class Dabhade team surprised audience with Rs 112 tickets on its release day
पहिल्याच दिवशी ११२ रुपयांत तिकीट; ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची प्रेक्षकांसाठी खास ऑफर

महिंद्रा XUV300 दिवाळी डिस्काउंट

महिंद्रा कंपनीची महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही अतिशय लोकप्रिय बेस्ट सेलिंग एसयुव्हीपैकी एक आहे. आता याची जागी XUV 3XO ने घेतली आहे. कंपनीचे काही आउटलेट्सवर ज्या XUV300 ची विक्री झाली नाही त्यावर आता कंपनी १.८ लाख रुपयांपर्यंत सुट देत आहे ज्याचे काही युनिट शिल्लक आहे.

महिंद्रा XUV400 दिवाळी डिस्काउंट

XUV400 EV ची मागील एका वर्षापासून विक्री कमी झाली आहे. या कारवर सध्या २ लाख रुपयांपेक्षा जास्त सूट दिली जात आहे. याचे काही युनिट शिल्लक आह जे कदाचित MY2023 च्या बॅचचे आहे ज्यावर ४.४ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

हेही वाचा : Tata Motors Diwali Offer : टाटा मोटर्स दिवाळीत ग्राहकांना करणार खूश, ‘या’ खास कारांवर मिळणार तगडा डिस्काउंट

महिंद्रा XUV700 दिवाळी डिस्काउंट

या वर्षी XUV700 च्या किंमती अनेकदा कमी केल्या आहेत आणि याचे फीचरमध्ये सुद्धा बदल केले आहे. तरी जास्तीत जास्त MY2023 मॉडेलची विक्री झाली आहे. पण काही यूनिट अजूनही शिल्लक आहे. ते १.८ लाख रुपयांपर्यंतच्या सूटसह सध्या उपलब्ध आहे. नवीन MY2024 स्टॉक वर जवळपास ४० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

महिंद्रा बोलेरो, बोलेरो नियो दिवाळी डिस्काउंट

बोलेरो ब्रॅण्डसाठी एक स्थिर विक्रेता आहे आणि आता विक्री न झालेले MY2023 स्टॉकवर १ लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. नवीन MY2024 इन्वेंट्रीवर जवळपास ३५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय बोलेरो नियो च्या विक्री न झालेल्या MY2023 स्टॉक वर जवळपास १.३५ लाख रुपयांची सूट दिली जात आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक दिवाळी डिस्काउंट

स्कॉर्पिओ क्लासिक गाडीचा एक वेगळा ग्राहक वर्ग आहे. स्कॉर्पिओ एनच्या लाँच नंतर यात अनेक अपडेट करण्यात आले. जुन्या स्टॉकवर विशेषत: MY2023 च्या स्टॉकवर १.२ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे

महिंद्रा स्कॉर्पियो एन दिवाली डिस्काउंट

या वेळी लोकप्रिय स्कॉर्पिओच्या विक्री कमी झाली आहे आणि काही ग्राहक याऐवजी नवीन थार रॉक्स निवडत आहे. स्कॉर्पिओ एन मध्ये अनेक इंजिन पर्याय, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक टान्समिशन पर्याय, अनेक सीटिंग कॉन्फिगरेशन आणि काही व्हेरिअंटमध्ये 4WD हॉर्डवेअर उपलब्ध आहे. या दिवाळीत या एसयुव्हीवर जवळपास १ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.

महिंद्रा थार दिवाळी डिस्काउंट

सर्व ग्राहकांचे लक्ष सध्या थार रॉक्सवर आहे. यंदा दिवाळीत तुम्हाला थार ३ डोरवर १.६ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

Story img Loader