महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ या कंपनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षात धमाल उडवून दिली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात कंपनीने ७३.४ टक्के इतका बाजारपेठेतील हिस्सा मिळवला आणि त्यामुळे ही थ्री व्हीलर इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनामध्ये देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. आर्थिक वर्ष २०२१ पासून या कंपनीने तब्बल २१४ टक्के इतकी वाढ साधली आहे. विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘महिंद्र इलेक्ट्रिक’कडे ‘ट्रिओ ऑटो’, ‘ट्रिओ यारी’, ‘ट्रिओ जोर’, ‘ई-अल्फा मिनी’ आणि ‘ई-अल्फा कार्गो’ अशा थ्री व्हीलर इलेक्ट्रीक वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. आतापर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त विक्रीचा टप्पा पार करणारा, लिथियम आयन बॅटरी असलेला, ‘ट्रिओ’ हा थ्री व्हीलर इलेक्ट्रीक वाहनांचा देशातील पहिला प्लॅटफॉर्म आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in