महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. या होणाऱ्या चर्चेचे कारण म्हणजे एका चिमुकल्याने अवघ्या ७०० रुपयांत आनंद महिंद्रांकडे महिंद्रा थार कारची मागणी केली आहे. आनंद महिंद्रानींही चिमुकल्याला उत्तरही दिले आहे. आनंद महिंद्रा हे देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक खेळाडूंचा नेहमीच सन्मान करतात. या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांना बक्षीस देऊन देशातील इतर खेळाडूंना किंवा युवकांना प्रेरणादायी संदेश देत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक क्रिकेटर्स, ऑलिंपिकविजेत्या खेळाडूंना महिंद्रा कंपनीच्या वेगवेगळ्या कार भेट देऊन त्यांचा गौरव केला आहे. चला तर या निमित्ताने आज आपण आनंद महिंद्रांनी कोणकोणत्या व्यक्तीला कोणत्या कार भेट दिल्यात, जाणून घेऊया..

महिला बॉक्सरला थार

मार्चमध्ये झालेल्या 2023 IBA वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनला महिंद्रा आणि महिंद्राने लोकप्रिय थार एसयूव्ही भेट दिली आहे.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

जुगाड करुन बनवली कार तर मिळाली बोलेरो

महाराष्ट्रातील दत्तात्रेय नावाच्या व्यक्तीने जुगाडकरुन छोटी एसयूव्ही बनवली होती. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रयची गाडी पाहत त्याचे कौतुक करत मिनी जिप्सीच्या बदल्यात त्याला नवी बोलेरो गाडी भेट दिली. 

आईला स्कूटरवरून तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला गाडी भेट

आईला स्कूटरवरून तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्यक्तीने स्कूटरवर २० राज्यांना भेट देत आपल्या आईला मंदिरात नेले होते. यानंतर आनंद महिंद्रा यांनी आपल्या आईवरील प्रेम आणि धैर्याची प्रशंसा करत या व्यक्तीला महिंद्रा KUV 100 NXT भेट दिली.

महिलेला मदत केली अन् मिळाली कार

केरळमधील २०१८ च्या पुरादरम्यान, एका मासेमाराने इतके धैर्य आणि माणुसकी दाखवली की जगभरात त्याचे कौतुक झाले. या मासेमाराने पुरात अडकलेल्या लोकांना खांद्यावर घेऊन रेस्क्यू बोटीपर्यंत नेले होते. यावेळी महिलेला बोटीत बसण्यात अडचण आल्यावर या व्यक्तीने महिलेला पाठीवर बसवून बोटीत बसण्यास मदत केली. व्हिडिओ समोर आल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी मासेमाराला मॅराझो भेट दिली.

बुद्धिबळ चॅम्पियनला ईव्ही

भारताचा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद बुद्धिबळ विश्वचषकाची अंतिम फेरी जिंकू शकला नाही पण त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनला कडवी टक्कर दिली. त्यानंतर त्याला रौप्य पदक देण्यात आले. महिंद्राच्या चेअरमननीही प्रज्ञानंद यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे खूप कौतुक केले आणि त्यानंतर त्यांनी त्यांना XUV400 EV भेट दिली.

नीरजला XUV 700

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण देशाला सन्मान मिळवून दिला. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी देशासाठी सुवर्ण मिळवून देणारा खेळाडू नीरज चोप्रा यांना XUV700 Javelin Edition भेट म्हणून दिली.

एकाच वेळी ६ क्रिकेटपटूंना थार

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२१ मध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर आनंद महिंद्रा स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी एक-दोन नव्हे तर ६ खेळाडूंना थार भेट दिली. या खेळाडूंमध्ये नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी नरराजन, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता.

इच्छा व्यक्त केली आणि मिळाली कार

२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत दुती पात्र ठरल्यानंतर, तिने एक दिवस स्वतःसाठी XUV500 खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आनंद महिंद्रा यांना तिची इच्छा कळली आणि तिला ही कार भेट म्हणून दिली.

किदाम्बी श्रीकांतला ‘ही’ कार भेट

टेनिसपटू किदाम्बी श्रीकांतने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद जिंकून देशाचा गौरव केला. हे विजेतेपद जिंकल्यावर आनंद महिंद्रा यांनी श्रीकांतला TUV300 भेट म्हणून दिली.

साक्षी आणि सिंधूला मिळाली मोठी भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून गौरव मिळवणाऱ्या साक्षी मलिक आणि शटलर पीव्ही सिंधू यांना आनंद महिंद्रा यांनीही मोठी भेट दिली. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या आवडीनुसार थार भेट म्हणून देण्यात आली.