Mahindra has given a Special Feature, if the Driver Sleeps then the Alarm Will Ring: आपल्या देशात रस्ते अपघातांचे (Road Accident) प्रमाण वाहनांच्या तुलनेत अधिक आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. मध्यरात्री तसंच पहाटेच्या वेळी अपघात (Accident) होण्याचं प्रमाण अधिक असल्याचंही दिसून आलं आहे. रात्री उशिरा वाहन चालवताना ड्रायव्हरना झोप येते किंवा डुलकी लागते आणि त्यामुळे भीषण अपघात घडतात. यामुळे आता कार कंपन्यांनी कारमध्ये असे फीचर देण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे तुम्हाला ड्राईव्ह दरम्यान झोप येणार नाही. आणि जर ड्रायव्हर झोपला असेल तर ते गाडीत बसलेल्या इतर लोकांनाही कळवेल. महिंद्रा ही भारतीय कार उत्पादकांपैकी पहिली आहे ज्याने त्यांच्या दोन SUV मध्ये हे वैशिष्ट्य सादर केले आहे. जाणून घेऊया काय आहे हे फीचर आणि कोणत्या वाहनांमध्ये ते देण्यात आले आहे.

‘हे’ खास फीचर काय आहे?

महिंद्राने आता Advanced Driver Assistance System (ADAS) सोबत ड्रायव्हर ड्रिझिनेस डिटेक्शन (DDD) वैशिष्ट्य दिले आहे. हे वैशिष्ट्य ड्रायव्हरला झोप किंवा डुलकीच्या बाबतीत सतर्क करते. कारच्या स्टीयरिंग व्हीलवर व्हायब्रेशन अलर्ट उपलब्ध आहे. या दरम्यान कारमध्ये सतत अलार्म वाजतो आणि मोठी दुर्घटना टळते.

Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला

(हे ही वाचा: मारुतीच्या ‘या’ दोन लोकप्रिय कार चालवणे धोकादायक आहे का? सुरक्षेच्या बाबतीत ठरल्या अपयशी )

फीचर कसे काम करते?

कारचे हे वैशिष्ट्य स्टीयरिंगवरील ड्रायव्हरच्या हालचाली ओळखते. जेव्हा कारला काही काळ स्टिअरिंगवर कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही, तेव्हा ती सक्रिय होते आणि कारच्या स्टीयरिंग व्हीलवर कंपन जाणवते. यासोबतच काही कारमध्ये हे फिचर अधिक प्रगत प्रणाली म्हणून देण्यात आले आहे. ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असला तरीही या वैशिष्ट्यामुळे कार सुरू होत नाही.

कोणत्या कारमध्ये आहे ‘हे’ वैशिष्ट्य ?

महिंद्राने आपल्या नवीन SUVs XUV 700 आणि Scorpio N मध्ये हे वैशिष्ट्य दिले आहे. हे फीचर दोन्ही एसयूव्हीच्या टॉप मॉडेल्समध्ये सादर करण्यात आले आहे. आता येत्या काळात अनेक कंपन्या आपल्या कारमध्ये हे फीचर आणणार आहेत. काही प्रिमियम कारमध्ये हे फिचर आधीच अस्तित्वात असले तरी या गाड्या बहुतांश विदेशी कंपन्यांच्या आहेत. महिंद्राने भारतीय कार उत्पादकांमध्ये प्रथमच ते सादर केले आहे.