Mahindra Best Celling car: महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra and Mahindra) गाड्या आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात. दणकट गाड्या अशी महिंद्राच्या गाड्यांची ओळख आहे. चार चाकी गाड्यांखेरीज महिंद्रा ट्रॅक्टर (Tractor) बनवण्यातही भारतातली एक अग्रेसर कंपनी मानली जाते. ट्रॅक्टर बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी म्हणूनही महिंद्रा अँड महिंद्रा कडे पाहिलं जातं. महिंद्राच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या महिन्यात महिंद्राच्या तीन गाड्यांना जोरदार मागणी होती. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या कार.
डिसेंबर २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या १७,४७७ युनिटच्या तुलनेत कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये २८,३३३ युनिट्सची विक्री केली आहे, जे ६२ टक्क्यांची मजबूत वाढ दर्शवते. हे पाहता, आज आम्ही तुम्हाला महिंद्राच्या गेल्या महिन्यात भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप ३ कारबद्दल सांगत आहोत, चला तर मग जाणून घेऊया.
(हे ही वाचा : TaTa Moters च्या ‘या’ SUV खरेदीसाठी लोकांनी लावल्या रांगा; Brezza, Creta आणि Punch सर्व पडल्या फिक्या )
महिंद्राच्या ‘या’ तीन गाड्यांना देशात मोठी मागणी
- महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)
बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ५,३१४ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत कंपनीने गेल्या महिन्यात ७,३११ युनिट्सची विक्री केली, जी ३८ टक्क्यांची वाढ दर्शवते.
- महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio)
स्कॉर्पिओ डिसेंबर २०२२ मध्ये ७,००३ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकाची बेस्ट सेलर म्हणून उदयास आली आहे जी गेल्या वर्षीच्या १,७५७ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत २९९ टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
- महिंद्रा XUV700 (Mahindra XUV700)
महिंद्रा XUV700 (महिंद्रा XUV700) गेल्या महिन्यात कंपनीची तिसरी बेस्ट सेलर होती. डिसेंबर २०२२ मध्ये XUV700 च्या विक्रीत ४१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि ५,६२३ युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षी ३,९८० युनिट्सची विक्री झाली होती. नवीन कार खरेदीदारांमध्ये XUV700 हा लोकप्रिय पर्याय आहे.