Mahindra Discount Offers for February 2023: फेब्रुवारीमध्ये, कार उत्पादक त्यांच्या कार विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलत आणि इतर ऑफर देत आहेत, ज्यामध्ये Hyundai India नंतर महिंद्रा आणि महिंद्राचे नाव जोडले गेले आहे. या महिन्यात, ते त्यांच्या निवडक कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. तुम्हीही डिस्काउंट ऑफरसह महिंद्रा (Mahindra) कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे जाणून घ्या की कोणती महिंद्रा कार खरेदी करून तुमची किती बचत होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mahindra Bolero February Discount

महिंद्रा बोलेरो ही ७ सीटर एसयूव्ही आहे जी भारताच्या ग्रामीण भागात खूप पसंत केली जाते. फेब्रुवारीमध्ये ही SUV खरेदी केल्यास कंपनी ७०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट या एसयूव्हीच्या व्हेरिएंटनुसार ठेवण्यात आली आहे. जर ग्राहकांनी महिंद्रा बोलेरोचे टॉप मॉडेल (0) खरेदी केले तर त्यावर ७० हजारांची सूट मिळेल. त्याच्या खालच्या वेरिएंट B4 वर ४७ हजारांची सूट आणि B6 व्हेरिएंटवर ५० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

(हे ही वाचा : कार्तिक आर्यनचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्याकडे आहेत ‘इतक्या’ महागड्या कार )

Mahindra Bolero Neo February Discount

कंपनीने नुकतीच महिंद्रा बोलेरो निओ लॉन्च केली आहे, ज्यावर फेब्रुवारी महिन्यात ५९ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या एसयूव्हीवर मिळणारी सवलतही वेरिएंटनुसार वेगळी ठरवण्यात आली आहे.

महिंद्राचे बोलेरो निओ टॉप मॉडेल N10 आणि N10 (0) खरेदी केल्यावर कंपनी ५९,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. त्याच्या खालच्या वेरिएंट N4 वर ३२,००० रुपयांपर्यंत आणि N8 वर ३४,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Mahindra XUV300 February Discount

XUV 300 ही एक मध्यम श्रेणीची SUV आहे, जी फेब्रुवारीमध्ये खरेदी केल्यास ३६,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. या एसयूव्हीची सवलतही कंपनीने व्हेरिएंटच्या आधारावर स्वतंत्रपणे ठरवली आहे.

Mahindra XUV300 च्या टॉप-एंड W8 मॉडेलवर महिंद्रा ३६,५०० पर्यंत सूट देत आहे. त्याच्या W8 (0) प्रकारावर ३५,००० रुपयांपर्यंत आणि W6 प्रकारावर ३०,००० रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

(हे ही वाचा : देशातील बाजारपेठेत ‘या’ इलेक्ट्रिक कारला पसंती; खरेदीसाठी लोकांची गर्दी, ‘या’ दिवशी होणार डिलिव्हरी सुरू )

Mahindra Marazzo February Discount

Mahindra Marazzo एक प्रीमियम MPV आहे ज्यावर फेब्रुवारी २०२३ मध्ये ३७ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या MPV वर उपलब्ध असलेल्या सवलती देखील प्रकारांच्या आधारावर विभागल्या जातात. बेस मॉडेल M2 वर ३७ हजार, अप्पर बेस मॉडेल M4 Plus वर ३७ हजारांची सूट उपलब्ध आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंट M6 Plus वर ३०,००० रुपये सवलत उपलब्ध आहे.