8 Seater Car: देशात ७ सीटर कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. मारुती ते किया आणि टोयोटा सारख्या कंपन्या या सेगमेंटमध्ये सतत पर्याय वाढवत आहेत. मारुती सुझुकीने अलीकडेच इनोव्हा हायक्रॉसचा रिबॅज केलेला अवतार ‘मारुती इनव्हिक्टो’ लाँच केला आहे. महिंद्राकडे सुद्धा ८ सीटर कार आहे, जी सुरक्षितता आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत उत्कृष्ट आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतातील दिग्गज कार निर्माता महिंद्रा (Mahindra) कडे सर्वात जास्त एसयूव्ही कार आहेत. कंपनी महिंद्रा एक्सयूव्ही ३००, थार आणि स्कॉर्पियो सारख्या कार सोबत विक्री करते. परंतु, कंपनीकडे एक अशी कार आहे. जी देशातील सर्वात सुरक्षित MPV आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ८ सीटर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला लग्झरी कार प्रमाणे स्पेस आणि कन्फर्ट मिळतो. या कारची किंमत फक्त १४ लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडलची किंमत १६.०२ लाख रुपयांपर्यंत जाते.

या कारचे नाव Mahindra Marazzo असून ही कार M2, M4 Plus, M6 Plus या तीन प्रकारांमध्ये (व्हेरियंट) उपलब्ध आहे. कारच्या तिन्ही प्रकारांमध्ये सात सीटर आणि आठ सीटर असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा : Royal Enfield सोडून ‘या’ बाईकच्या मागे लागले लोकं, होतेय धडाधड विक्री, १० दिवसातच १० हजारपेक्षाही जास्त बुकींग  )

महिंद्रा माझ्झो कारमध्ये सुरक्षिततेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस सोबत ईबीडी, सर्व व्हील्स वर डिस्क ब्रेक, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, मागील दरवाजावर चाइल्ड सेफ्टी लॉक, इम्पॅक्ट सेंसिग ऑटो डोर लॉक आणि इंजिन इमोबिलायजर आहे.

डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे. डॅशबोर्डवरच ७ इंचाची इन्फोर्मेशन टच स्क्रीन देण्यात आली असून त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. एक्सयुव्ही ५०० आणि केयुव्ही १०० नंतरही ही महेंद्राची सर्वात प्रिमियम कार असणार आहे. नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या दृष्टीने या गाडीचे डिझायनिंग करताना त्यामध्ये शार्क ग्रील्स, शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स, शार्क फीन अॅण्टीना असे भन्नाट लुक्स देण्यात आला आहे.

Marazzo फक्त डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे आणि १.५-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे १२१bhp आणि ३००Nm टॉर्क निर्माण करते आणि सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Marazzo ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ४ स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केले आहे. Mahindra Marazzoझो किआ केरेन्स, मारुती सुझुकी XL6 आणि Hyundai Alcazar सारख्यांना टक्कर देते.