8 Seater Cars: भारतात मोठ्या कुटुंबांकडून ७ ते ८ सीटर कारना तगडी डिमांड आहे. अशा कुटुंबांसमोर स्वस्त आणि महागडे असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील तुमच्या मोठ्या कुटुंबांसाठी एखादी एमयूव्ही म्हणजेच मल्टी युटिलिटी व्हेईकल, खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातल्या सर्वात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ८ सीटर कारची माहिती देणार आहोत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार कोणतीही ८ सीटर कार निवडू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mahindra Marazzo

Mahindra Marazzo ही कार तुमच्यासाठी खास ८ सीटर कार आहे. या कारची किंमत १३.४१ लाखांपासून सुरू ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले १.५-लिटर डिझेल इंजिन (122PS आणि 300Nm) चा पर्याय आहे.

(हे ही वाचा : ‘या’ १५ कार खरेदीवर मिळवा घसघशीत डिस्काउंट; पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट? )

Lexus LX

Lexus LX ही कार तुमच्यासाठी खास ८ सीटर कार आहे. या कारची किंमत २.६३ कोटी रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतात. ही SUV ७.७ सेकंदात ०-१००kmph चा वेग वाढवते.

Toyota Innova Crysta

Toyota Innova Crysta ही कार तुमच्यासाठी खास ८ सीटर कार आहे. या कारची किंमत १८.१४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार २.७-लीटर पेट्रोल इंजिनसह येते.