गेल्या काही काळापासून कार्सची चांगली विक्री होत आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग चांगली कामगिरी करत आहे. अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या आहेत. यावर्षीही आतापर्यंत अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. बहुतांश कार कंपन्यांच्या विक्रीतही तेजी दिसून येत आहे. कार विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झालेली दिसून आली.
महिंद्रा आणि महिंद्रा ही देशातली चौथी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. ही भारतीय वाहन उत्पादक कंपनी बाजारात उत्तम कामगिरी करत आहे. भारतीय बाजारपेठेत महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या अनेक लोकप्रिय एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत विकल्या जातात, ज्यामध्ये बोलेरो आणि स्कॉर्पिओचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत महिंद्रा थारलाही सर्वाधिक मागणी आहे. तर दुसरीकडे भारतीय बाजारपेठेत महिंद्राची एक कार अशीही आहे, ज्या कारची विक्री बाजारात थंडावली आहे.
महिंद्राच्या Marazzo MPV या कारची गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये केवळ ६२ युनिट्सची विक्री झाली आहे. Marazzo MPV ही भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, ही कार सात आणि आठ सीटर्सच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. या कारमध्ये आपल्याला लक्झरी कार प्रमाणे स्पेस मिळते.
(हे ही वाचा : “…तर मला माझ्याच कंपनीतून काढलं असतं”, ‘ही’ SUV कार ठरली असती कारणीभूत; आनंद महिंद्रांनी सांगितला ‘तो’ किस्सा )
महिंद्रा कंपनीने मराझो या गाडीचं डिझाईन शार्क माशापासून प्रेरित होऊन तयार केलं आहे. MPV मराझोची ग्रिल, टेललाइट आणि शार्कफिन अँटिना यामुळे गाडीची डिझाईन अगदी शार्क सारखीच दिसते. Marazzo डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे आणि १.५-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे १२१bhp आणि ३००Nm टॉर्क निर्माण करते आणि सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Marazzo ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ४ स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केले आहे.
महिंद्राने ही कार M२, M४, M६ आणि M८ या चार व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार ६ रंगांत लॉन्च केली आहे. या गाडीत ७ इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टमसोबत अँड्रॉईड ऑटो आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स दिले आहेत. या कारची किंमत १३ लाख रुपयांपासून सुरू होते.