महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ही भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी त्यांच्या Mahindra Thar SUV वर जून महिन्यामध्ये ६०,००० रुपयांची सवलत देत आहे. एबीपी लाइव्हने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनी ठराविक डीलरशिपमध्ये महिंद्रा थारच्या खरेदीवर कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस मिळत आहे. देशभरात काही डीलरशिपद्वारे या महागड्या कारवर ४०,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि २५,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे.
एबीपी लाइव्हच्या माहितीनुसार, महिंद्रा थार एसयूव्हीच्या एलएक्स व्हेरिएंटच्या 4×4 एटी व्हर्जनवर ही डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. या व्हेरिएंट व्यतिरिक्त ही चारचाकी कार 3 रियल व्हील ड्राइव्ह वेरिएंट्सना देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात आरडब्लूडी डिझेल एमटी, एलएक्स आरडब्लू डिझेल आणि एलएक्स आरडब्लूडी पेट्रोल एटीचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी महिंद्रा थारच्या १ लाख युनिट्सची विक्री झाली होती. ही कार ऑक्टोबर २०२० मध्ये लॉन्च करण्यात आली होती. फक्त ३ वर्षांमध्ये या कारने विक्रम रचला.
किंमत
महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. या गाडीमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे, ज्यामुळे 117 पीएस पावर आणि ३०० एनएम टॉर्कची क्षमता मिळते. याशिवाय त्यामध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील आहे. हे इंजिन 150 पीए आणि 320 एनएन टॉर्कची निर्मिती करु शकते. या आलिशान गाडीची एक्स शोरुम किंमत १०.५४ लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच याच्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत १६.७८ लाख रुपये इतकी आहे. महिंद्रा कंपनीची ही कार मारुती सुझुकी जिम्नीला टक्कर देते असे म्हटले जाते.