Mahindra Cars Price Hike: सणासुदीच्या आधीच महिंद्राने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. थार, स्कॉर्पिओ एन, XUV300 आणि XUV700 च्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. कंपनीने वाहनांच्या किमती का वाढवल्या आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसली तरी पुरवठा साखळीच्या समस्यांना तोंड देत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वाढत्या समस्या हेही महिंद्राच्या गाड्या महाग होण्यामागे कारण असू शकते, असे मानले जात आहे.
तथापि, सध्या कंपनीने आपल्या ऑल-इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV XUV400 च्या किमती वाढवलेल्या नाहीत. बोलेरो क्लासिक आणि बोलेरो निओच्या किंमतींची यादीही पूर्वीसारखीच आहे.
कोणती एसयूव्ही अधिक महाग झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, Scorpio Classic ची किंमत २४ हजार रुपयांवरून २६ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. स्कॉर्पिओ एनच्या किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली असून ती आता ६६ हजार रुपयांनी महागली आहे. त्याचवेळी, महिंद्रा थार देखील महाग झाली आहे आणि एसयूव्हीच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत आता १० लाख रुपयांच्या खाली नाही. थारच्या दरात ४४ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
(हे ही वाचा : सणासुदीत ग्राहकांना दिलासा! Hyundaiच्या ‘या’ कार्सवर बंपर सूट, पाहा खरेदीवर किती होईल तुमच्या पैशांची बचत )
नवीन दर पाहा
- थार बद्दल बोलायचे झाले तर आता त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १०.९८ लाख रुपये असेल. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत १६.९४ लाख रुपये एक्स-शोरूम असेल.
- XUV300 बद्दल बोलायचे झाले तर, ते आता ७.९९ लाख ते १४.७६ लाख एक्स-शोरूमच्या किमतीत उपलब्ध असेल.
- Scorpio Classic चे बेस व्हेरिएंट आता १३.२५ लाख आणि टॉप व्हेरियंट १७.०६ लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल.
- Scorpio N ची सुरुवातीची किंमत १३.२६ लाख रुपये असेल आणि टॉप व्हेरिएंटची किंमत २४.५३ लाख रुपये एक्स-शोरूम असेल.
- XUV700 ची किंमत वाढल्यानंतर, बेस व्हेरिएंट १४.०३ लाख आणि टॉप व्हेरिएंट २६.५७ लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध होईल.