फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने ट्रॅक्टर्स सेल्स डेटा (ट्रॅक्टर्सच्या विक्रीबाबतची आकडेवारी) जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात या सेगमेंटमधील वाहनांच्या विक्रीत ४ टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भारतात ८१,०६७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात देशात ७८,०७० युनिट्सची विक्री झाली होती. भारतात सर्वाधिक पसंती महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर्सना मिळाली आहे.

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने गेल्या महिन्यात भारतात १७,७७३ ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे. भारतातल्या ट्रॅक्टर्सच्या बाजारात महिंद्राचा वाटा २२ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १४,०९३ युनिट्सची विक्री केली होती. महिंद्राच्या ट्रॅक्टर्सच्या विक्रीत २६.११ टक्के वाढ झाली आहे. या यादीत दुसरा क्रमांक स्वराज ट्रॅक्टर्सने पटकावला आहे. कंपनीने १४,१०० युनिट्स ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे. तर मार्च २०२२ मध्ये कंपनीने १०,७९१ युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच स्वराजच्या विक्रीत ३,३०९ युनिट्सची वाढ झाली आहे. स्वराजच्या ट्रॅक्टर्सच्या विक्रीत ३०.६६ टक्के वाढ झाली आहे.

हे ही वाचा >> आली रे आली! देशात नवी Lamborghini कार दाखल, स्पीड पाहून व्हाल थक्क, किंमत…

सोनालिकाच्या ट्रॅक्टर्सची विक्री वाढली

सोनालिका कंपनी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कंपनीने गेल्या महिनयात ९,८७० युनिट्स ट्रॅक्टर्स विकले आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ९,२९३ ट्रॅक्टर्स विकले होते. सोनालिकाने ५७७ ची युनिट्स अधिक विकत ६.२१ टक्के वाढ नोंदवली आहे. तर एस्कॉर्ट्स कंपनीने ९,००९ ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे. ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे. तर टॅफे कंपनीने ८,९३६ ट्रॅक्टर्स विकले आहेत. ही कंपनी देशात पाचव्या नंबरववर आहे.