९० च्या दशकात भारतातील लोक चांगल्या एसयूव्हीच्या शोधात होते. हा शोध पूर्ण करण्यासाठी एका देशांतर्गत कंपनीने सर्वोत्तम एसयूव्ही लाँच केली. ही एसयूव्ही डीआय इंजिनसह बाजारात दाखल झाली होती. ही कंपनी महिंद्रा होती. महिंद्राने देशातील लोकांची गरज समजून घेत उत्कृष्ट आरामदायी एसयूव्ही बनवली ज्यामध्ये सात लोक सहज प्रवास करू शकतील. ही SUV लूकमध्ये छान होती, त्यावेळेस फीचर्स सुद्धा भरपूर दिले गेले होते, बिल्ट क्वालिटी चांगली होती आणि ती पॉवरफुल देखील होती. काही वेळातच, लोकांची आवडती फॅमिली कार म्हणून स्वतःचे नाव कमावले. यामुळे महिंद्राची ओळखही बदलली आणि महिंद्रा केवळ व्यावसायिक वाहन निर्मात्यापासून एक कौटुंबिक कार निर्माता म्हणून उदयास आले.
आम्ही आज महिंद्रा स्कॉर्पिओबद्दल बोलत आहोत. २० वर्षांहून अधिक काळ येत असलेल्या, Scorpio ने SUV मार्केटमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. कंपनीने कालांतराने ही कार सतत अपग्रेड केली आहे आणि सध्या स्कॉर्पिओ दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन. आज आपण Scorpio Classic बद्दल बोलणार आहोत. ही एसयूव्ही होती जिने नेहमीच सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. चला जाणून घेऊया या कारची खासियत ज्यामुळे ती लोकांची आवडती SUV बनते.
(हे ही वाचा : कारमध्ये एअरबॅग असल्यास सीटबेल्ट घालण्याची गरज नाही का? गडकरींनी स्पष्टच सांगितलं, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी…” )
मॅन्युअल ट्रान्समिशनसह यामध्ये २.२ लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. या कारमध्ये कंपनी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देते. नवीन स्कॉर्पिओ एन स्टाईलच्या बाबतीत जुन्या स्कॉर्पिओवर मात करते. तुम्ही जर एखादी दमदार एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्कॉर्पिओ एनचा उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांच्या बाबतीत, तुम्हाला कारमध्ये २ एअरबॅग, स्पीड सेन्सिंग दरवाजा लॉक, सीट बेल्ट अलार्म, चाइल्ड लॉक्स, 3 वे अॅडजस्टेबल सीट बेल्ट, क्रॅश गार्ड, EBD, ABS सारखी वैशिष्ट्ये मिळतात.
Scorpio Classic च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, S प्रकार १३ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे, तर एसयूव्हीचा टॉप व्हेरिएंट S11 आहे, ज्याची किंमत १६.८१ लाख रुपये आहे.