Best Selling 7 Seater Car: जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला एकत्र कुठेही जायचे असेल तर अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे एक मोठी ७ सीटर कार असावी, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासह प्रवासाचा आनंद घेऊ शकता. देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचे कुटुंब मोठे आहे आणि त्यांना ७ सीटर कार खरेदी करायची आहे. जर तुम्हालाही सात सीटर एसयुव्ही खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एप्रिल २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या सात सीटर एसयुव्ही कारबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कार घेण्यास मदत होईल.
‘या’ सात सीटर कारची जोरात विक्री
सात सीटर कारमध्ये दमदार लुक मिळाला आहे, याच कारणामुळे महिंद्रा स्कॉर्पिओ ही एप्रिल महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर कार ठरली आहे. मुळात व्हॅन श्रेणीत येणारी मारुती इको फक्त स्कॉर्पिओपेक्षा जास्त खरेदी केली. चला तर पाहूया कोणत्या सात कारची सर्वाधिक विक्री झाली जोमात….
महिंद्रा स्कॉर्पिओ ही एप्रिल २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी सात सीटर कार ठरली आहे, ज्याच्या ९,६१७ युनिट्सची विक्री झाली आहे आणि तिने २५५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनी Scorpio दोन मॉडेल्समध्ये विकते – Mahindra Scorpio N आणि Mahindra Scorpio Classic. त्यांची किंमत सुमारे १३ लाख रुपयांपासून सुरू होते.
(हे ही वाचा : क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने खरेदी केलेली शक्तिशाली बाईक २१ हजारात आणा घरी, १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल… )
दुसरे स्थान महिंद्रा बोलेरोने घेतले, ज्याने १८ टक्क्यांची वाढ नोंदवून ९,०५४ युनिट्सची विक्री केली. यादीतील तिसरे स्थान किआ केरेन्सने व्यापले, ज्याने ६,१०७ युनिट्स विकल्या आणि ६ टक्क्यांची वाढ नोंदवली. यानंतर या यादीतील बहुतांश कारच्या विक्रीत घट झाली आहे.
चौथ्या स्थानावर मारुती सुझुकी एर्टिगा होती, जिने ५,५३२ युनिट्सची विक्री केली आणि ६३ टक्क्यांची घसरण नोंदवली. Ertiga साठी ही एक मोठी निराशा आहे कारण तीच कार आहे जी सर्वात जास्त विक्रीच्या यादीत होती. त्यापाठोपाठ टोयोटा इनोव्हाने २४ टक्क्यांची घट नोंदवून ४,८३७ युनिट्सची विक्री केली.
महिंद्रा XUV700 सहाव्या स्थानावर आहे, ४,७५७ युनिट्सची विक्री करून, ६ टक्क्यांची वाढ. मारुती सुझुकी XL6 ने २,८६० युनिट्स विकल्या, ३४ टक्क्यांची घट. टोयोटा फॉर्च्युनरने २,५७८ युनिट्स विकल्या, २७ टक्क्यांची वाढ. रेनॉल्ट ट्रायबरने २,०७९ युनिट्स विकल्या, २९ टक्क्यांची घट झाली.
(हे ही वाचा : २४,५०० पेक्षा जास्त बुकिंग मिळालेल्या मारुतीच्या SUV खरेदीसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, वेटिंग पीरियड ८ महिन्यांवर )
बेस्ट सेलिंग 7 सीटर कारची विक्री
Mahindra Scorpio – ९,६१७ युनिट्स
Mahindra Bolero – ९,०५४ युनिट्स
Kia Carens – ६,१०७ युनिट्स
Maruti Suzuki Ertiga – ५,५३२ युनिट्स
Toyota Innova – ४,८३७ युनिट्स
Mahindra XUV700 – ४,७५७ युनिट्स
Maruti Suzuki XL6 – २,८६० युनिट्स
Toyota Fortuner – २,५७८ युनिट्स
Renault Triber – २,०७९ युनिट्स
Hyundai Alcazar – २,०३७ युनिट्स