Global ncap crash test rating : वाहन खरेदी करताना त्याचे फीचर्सच नव्हे तर मजबुती आणि त्यातील सुरक्षा उपाययोजना तपासणे गरजेचे आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून या पार्श्वभूमीवर विचार करून वाहन घेतले पाहिजे. सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास वाहनाचे सेफ्टी रेटिंग तपासले पाहिजे. ग्लोबल एनसीएपी हे क्रॅश टेस्टिंग घडवून कार किती सुरक्षित आहे हे तपासते. अलीकडे ‘GLOBAL NCAP’ने काही वाहनांची चाचणी घेतली असून त्याचे निकाल जारी केले आहेत. क्रॅश टेस्टमध्ये कोणत्या वाहनांनी उत्तम कामगिरी केली आहे. याबाबत जाणून घेऊया.

१) महिंद्रा स्कॉर्पिओ एनला ५ स्टार रेटिंग

Indian astronomers discover a giant cosmic web filament Spread over eight and a half million light years
खगोलशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन; शोधला वैश्विक जाळ्याचा तंतू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How to Practice Mock Tests For Exams
SBI PO & Clerk Exam Tips : परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? मग मॉक टेस्टचा ‘असा’ करा सराव
ISRO satellite launch , Sriharikota, andhra pradesh, 100th successful flight,
ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित
‘एनव्हीएस-०२’चे आज उड्डाण
Cancer causing chemicals on smart watches and bands
स्मार्टवॉच का ठरतंय जीवघेणं? नव्या अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल

ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये scorpio n वाहनाला विविध सेगमेंटमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाली आहे. प्रौढ सुरक्षेच्या बाबतीत वाहनाला ३४ पैकी २९.२५ अंक मिळाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या एसयूव्हीला ४८ पैकी २८.९४ रेटिंग मिळाली आहे. सेफ्टी असिस्टेंसच्या बाबतीत या वाहनाला १७ पैकी १६ टक्के रेटिंग मिळाले आहे.

(ग्राहकांसाठी नवा पर्याय! CITREON लाँच करणार इलेक्ट्रिक कार, टाटा टिगोरला देणार टक्कर, जाणून घ्या रेंज)

२) स्कोडा कुशक आणि फॉक्सवेगन टाइगूण

Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun या भारतात मिळणाऱ्या दोन वाहनांनी देखील सुरक्षेच्याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. या दोन्ही कारला ग्लोबल एनकॅपकडून ५ स्टार रेटिंग देण्यात आली आहे. चाचणीमध्ये अडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन आणि चाइल्ड प्रोटेक्शनचा समावेश होता. या दोन्ही वाहनांचे फ्रंटल आणि साइड इफेक्ट सुरक्षा, साइड इफेक्ट पोल सुरक्षा, इएससीचे मुल्यांकन केले गेले.

स्विफ्ट, इग्निस, एस प्रेसोला केवळ १ स्टार रेटिंग

जीएनसीएपीच्या अहवालनुसार, स्विफ्ट, एस प्रेस्सो आणि इग्निस या मारुती सुझुकीच्या ( Maruti suzuki car gncap crash test ) तीन वाहनांना केवळ १ स्टार रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे, केवळ स्विफ्टलाच प्रौढ आणि बाल सरंक्षण या दोन्ही श्रेणींमध्ये वन स्टार रेटिंग मिळाले आहे. तर एस प्रेस्सो आणि इग्निस चांगली कामगिरी करू शकले नाहीत. बाल संरक्षण चाचण्यांमध्ये त्यांना शुन्य स्टार मिळाले.

(सुरक्षा चाचणीत कमकुवत ठरल्या ‘या’ ३ CAR, मिळाले केवळ 1 STAR RATING, खरेदीपूर्वी पाहा लिस्ट)

‘GNCAP’ने 2020 मध्ये सिंगल एअरबॅग S Presso ची चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारतात बनवलेल्या आणि विकल्या जाणाऱ्या वाहनाला 1 स्टार रेटिंग दिले आहे. मारुतीचे कोणतेही मॉडेल मानक किंवा पर्यायी उपकरणे म्हणून ईएससी किंवा साइड कर्टन एअरबॅग प्रदान करत नाहीत. अशा प्रकारे फ्रंटल क्रॅश चाचणीदरम्यान तिन्ही वाहनांना मोठे नुकसान झाले.

Maruti suzuki swift कारने चालकाच्या आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला चांगली सुरक्षा देण्यासह समाधानकारक फ्रंटल इम्पॅक्ट दाखवला. मात्र चालकाच्या छातीला कमकुवत सुरक्षा आणि प्रवाशाच्या छातीला समाधानकारक सुरक्षा मिळाल्याचे दिसून आले. चालकाचे गुडघे आणि प्रवाशाच्या उजव्या गुडघ्याला किरकोळ संरक्षण मिळते. कारच्या पुढल्या भागाच्या मागच्या धोकादायक संरचनांमुळे त्यांना इजा होऊ शकते.

(प्रवाशी सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे पाऊल, १५ वर्षांच्या वाहनांबाबत घेतला मोठा निर्णय)

Maruti ignis कारबाबत बोलायचे झाल्यास कारने चालक आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला फाइन फ्रंटल इम्पॅक्ट केला. चालकाच्या छातीला कमजोर सुरक्षा आणि प्रवाशाच्या छातीला पुरेसे संरक्षण मिळाल्याचे आढळले. चालक आणि प्रवाशाच्या गुडघ्यांना किरकोळ संरक्षण दिसून आले.

एस प्रेस्सोने चालक आणि प्रवाशाच्या डोक्यावर आणि मानेवर चांगलाच फ्रंटल इम्पॅक्ट दिला. चालकाच्या छातीला खराब संरक्षण मिळाल्याचे दिसले ज्यामुळे १ स्टार रेटिंग मिळाले आणि प्रवाशाच्या छातील किरकोळ संरक्षण मिळाल्याचे दिसले. चालकाच्या गुडघ्यांना किरकोळ संरक्षण मिळते.

Story img Loader