भारतात दर महिन्याला लाखो कार विकल्या जातात. यातील काही मॉडेल्स लोकांना फारसे आवडत नाहीत, परंतु काही मॉडेल्स असे आहेत की अनेक वर्षांनंतरही लोकांना ते खूप आवडतात आणि त्यांची विक्री सुरूच असते. यापैकी एक कार महिंद्रा स्कॉर्पिओ आहे, जी देशात खूप लोकप्रिय आहे. बाजारात येऊन अनेक वर्षांनीही त्याची चांगली विक्री होते. महिंद्रा पुण्यातील चाकण प्लांटमध्ये त्याचे उत्पादन करते. या एसयूव्हीच्या विक्रीने आतापर्यंत ९ लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे.
२००२ पासून विक्री
महिंद्रा स्कॉर्पिओ पहिल्यांदा २००२ मध्ये देशात करण्यात आली होती. त्यानंतर ते अनेक वेळा अपग्रेड करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कंपनीने ते दोन मॉडेल्समध्ये सादर केले होते, एक स्कॉर्पिओ क्लासिक आणि दुसरी स्कॉर्पिओ एन. नवीन Scorpio N ची विक्री जुन्या Scorpio पेक्षा खूप वेगवान आहे आणि लोकांना ही SUV खूप आवडली आहे. महिंद्राची ही सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे. मे २०२३ मध्ये या SUV च्या एकूण २,३१८ युनिट्सची विक्री झाली आहे. जे वर्ष-दर-वर्षाच्या आकडेवारीनुसार १८४ टक्क्यांनी अधिक आहे.
(हे ही वाचा : खरेदीची सुवर्णसंधी! दणकट, अन् पाण्यातूनही आरामात जाणाऱ्या ‘या’ पिकअप ट्रकवर ८ लाखांपर्यंतची सूट )
किंमत
Mahindra Scorpio Classic च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, ते १३ लाख ते १६.८१ लाख च्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे, ते S, S11 सारख्या फक्त दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. Mahindra Scorpio-N ची एक्स-शोरूम किंमत १३.०५ लाख ते २४.६२ लाख दरम्यान आहे आणि त्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
‘या’ कारला देते टक्कर
महिंद्रा च्या या SUV ची स्पर्धा Hyundai Creta शी आहे, जी सध्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाते आणि पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या निवडीसह ऑफर केली जाते.