सध्या बाजारामध्ये मारूती सुझुकीची जिमनी आणि महिंद्रा थार यांच्यामध्ये स्पर्धा आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये असणाऱ्या स्पर्धेबद्दल खूप चर्चा देखील सुरू आहे. मारूती जिमनी ही ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. या आधी आपण या दोन्ही गाड्यांच्या किंमतीची तुलना पाहिली आहे. आज आपण जिमनी आणि थार यांच्यातील मायलेजमधील तुलना जाणून घेणार आहोत.

मारूती सुझुकीच्या जिमनी या कारमध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १०३ बीएचपी पॉवर आणि १३४ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी ५-स्पीड AMT आणि ४-स्पीड AT असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंटमध्ये मानक म्हणून 4WD चा समावेश आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Image Of Bajran Sonawane
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, बजरंग सोनावणे म्हणाले, “आरोपींना पैसे पुरवणारे…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
well equipped gang stole 500 liters of diesel on Samriddhi Highway
समृद्धी महामार्गावर ५०० लिटर डिझेलची चोरी, टोळ्यांकडून चारचाकी वाहनांचा वापर…
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”
Suzuki Access 125 price features amd more
स्कूटरप्रेमींनो, Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् सर्व काही
boy studying in class 10 killed his father with help of his mother in Hudkeshwar police station limits
Video : आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, महागड्या कार भस्मसात; मलकापूरमध्ये भीषण…

हेही वाचा : मारूती सुझुकी Jimny Vs Gypsy: कोणामध्ये मिळतात जास्त फीचर्स? कोण आहे बेस्ट, जाणून घ्या

तर दुसऱ्या बाजूला महिंद्रा थारमध्ये २.० लिटरचे mStallion 150 TGDi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १५० बीएचपी पॉवर आणि ३२० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड MT किंवा ६-स्पीड AT सह जोडले जाऊ शकते. थारमध्ये RWD आणि ४WD असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.

जिमनी व थारचे मायलेज

मारूती सुझुकीच्या जिमनी MT ४WD या व्हेरिएंटचे मायलेज हे एका लिटरमागे १६.९६ इतके आहे. तर जिमनीच्या AT ४WD मॉडेलचे मायलेज MT मॉडेलपेक्षा थोडेसे कमी आहे. या व्हेरिएंटचे मायलेज एका लिटरमागे १६.३९ इतके आहे. तर दुसरीकडे अनेक महिंद्राच्या डिलरशिप्सने इंडिया टुडेशी बोलताना थारचे मायलेज हे १३ kmpl इतके असल्याचे सांगितले आहे.

नव्यानेच लॉन्च झालेली मारूती सुझुकी जिमनी Zeta आणि Alpha Trims या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही प्रकारानुसार जिमनीच्या एक्सशोरूम किंमती जाणून घेऊयात.

Zeta MT – १२. ७४ लाख रूपये
Zeta AT – १३.९४ लाख रूपये
Alpha MT – १३. ६९ लाख रूपये
Alpha AT – १४.८९ लाख रूपये
Alpha MT (Dual Tone) – १३.८५ लाख रूपये
Alpha AT (Dual Tone) – १५.०५ लाख रूपये

हेही वाचा : भारतात लवकरच लॉन्च होणार ह्युंदाईची Exter मायक्रो एसयूव्ही ; जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Maruti Suzuki Jimny किंमत

नवीन मारुती जिमनीसाठी अधिकृत बुकिंगही सुरू झाले आहे आणि कंपनी तिच्या प्रीमियम नेक्सा डीलरशिपद्वारे त्याची विक्री करेल. इच्छुक ग्राहक ११,००० रुपयांच्या बुकिंग रकमेसह ही SUV बुक करू शकतात. माहितीनुसार, कंपनी येत्या मे महिन्यापर्यंत ही SUV बाजारात विक्रीसाठी आणू शकते. किंमतीचा विचार करता, असे मानले जाते की त्याची किंमत सुमारे १०.५ लाख रुपयांपासून ते ११ लाख रुपयांपर्यंत असू शकते. महिंद्रा थारची सध्याची किंमत ९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Story img Loader