Mahindra Thar : रांगड्या, रफ अ‍ॅण्ड टफ गाडय़ा तयार करणे ही मिहद्राची खासियत. स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही५००, झायलो या गाडय़ा याच पठडीतल्या. ऑफ रोड ड्रायिव्हिंगसाठीच त्या जास्त ओळखल्या जातात. मिहद्रा थार ही त्यात जरा वरच्या वर्गातली. खास जंगल सफारीसाठी तयार करण्यात आलेली ही थार अ‍ॅडव्हेंचर्ससाठी तर पर्वणीच . थार प्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वांत प्रसिद्ध कार म्हणजेच महिंद्रा थार. लोकांना महिंद्रा अँड महिंद्राच्या एसयूव्हीचे प्रचंड वेड आहे. विशेष म्हणजे महिंद्रा थार आणि थार रॉक्स ही पसंतीची कार आहे. या महिन्यात महिंद्राच्या थार 3 डोअर मॉडेलच्या विविध व्हेरिएंटवर ५६ हजार ते ३.०६ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. वास्तविक, डीलरशिप लेव्हलवर डिस्काउंट दिले जात आहे. तर, थारच्या कोणत्या व्हेरिएंटवर तुम्हाला किती फायदा होईल ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहकांनो या व्हेरिएंटवर होणार सर्वात कमी फायदा

महिंद्रा थार 3 डोअर मॉडेलच्या 2WD व्हेरिएंटवरही ग्राहकांना चांगले फायदे मिळतील. सर्वात कमी फायदा थार RWD १.५ लिटर डिझेल व्हेरिएंटवर आहे. तसेच, पेट्रोल इंजिन पर्यायामध्ये, तुम्हाला रियर व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटवर १.३१ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. वास्तविक, थारच्या डिझेल व्हेरिएंटची मागणी खूप जास्त आहे, त्यामुळे डीलरशिप त्यावर कमी सूट देत आहेत.

सर्वात जास्त डिस्काउंट या व्हेरिएंटवर


महिंद्रा थार अर्थ एडिशनवर जास्तीत जास्त सूट मिळत आहे. डीलरशिप लेव्हलवर, ग्राहकांना या महिन्यात Thar ३ डोअर मॉडेलच्या अर्थ एडिशन टॉप स्पेक LX ट्रिप व्हेरिएंटवर कमाल ३.०६ लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःसाठी महिंद्रा थार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक चांगली संधी आहे, जिथे तुमचे खूप पैसे वाचतील.

हेही वाचा >> वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास

महिंद्रा थार किंमत आणि फीचर्स

किंमत आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास तर, या पॉवरफूल एसयूव्हीची सध्याची एक्स-शोरूम किंमत ११.३५लाख ते १७.६० लाख रुपये आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी कंपनी फेसलिफ्ट अवतारात थार ३ डोअर मॉडेल लाँच करू शकते, ज्यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प, १९ इंच अलॉय व्हील, उत्तम इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ असेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra thar earth edition with more than 3 lakh rupees discount see thar other variant offers srk