Mahindra Thar: ऑफ रोडर एसयूव्ही हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर ज्या कार येतात त्यातलं पहिलं नाव हे महिंद्रा थार हेच असतं. ही कार भारतीय ग्राहकांची आवडती ऑफ रोडर एसयूव्ही आहे. या कारने भारतीय ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या कारचा दमदार लूक मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करतो. लूकशिवाय या कारचं दमदार इंजिन आणि त्यातले फीचर्स देखील या कारला उत्कृष्ट बनवतात. दरम्यान, या एसयूव्हीचे यश आणि ग्राहकांची मागणी पाहता कंपनी लवकरच ५ डोअर व्हेरिएंट लाँच करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Mahindra Thar किंमत होणार कमी?

आता नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर महिंद्रा थारची किंमत भारतात लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत करनिश्चितीसाठी एसयूव्हीच्या व्याख्येमध्ये सरकारने बदल केला आहे. सध्या भारतात विकल्या जाणार्‍या काही लोकप्रिय SUV या आता ‘SUV’नाहीत, ज्यामुळे कर कमी होणार आहे.

(हे ही वाचा : Maruti Suzuki: आता चालवा टू व्हिलरच्या मायलेजमध्ये फोर व्हिलर; मारुती घेऊन येत आहे ‘ह्या’ जबरदस्त कार )

वाहनाची इंजिन क्षमता १५००cc पेक्षा जास्त असावी, त्याची लांबी ४०००mm पेक्षा जास्त असावी आणि १७० ग्राउंड क्लिअरन्स असावा. जर एखादी कार यापैकी कोणत्याही एका अटीचे पालन करण्यात अयशस्वी ठरली, तर ती SUV म्हणून वर्गीकृत केली जाणार नाही. असे कौन्सिलने स्पष्ट केले आहे. जीएसटी कौन्सिलनुसार, एसयूव्हीवर २८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के सेस किंवा एकूण कराच्या ५० टक्के आकारणी होईल. आता महिंद्रा थार ही एसयूव्ही नसल्यामुळे कारच्या ऑन-रोड किमती कमी होण्याची शक्यता आहे.