अलिकडे मीड साईज एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. ऑफ रोड फीचर, मोठ्या साईजमुळे ही वाहने ग्राहकांना आकर्षित करत आहेत. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात विक्रीच्या बाबतीत एका मिड साईज एसयूव्हीने टाटा हॅरियर आणि अल्काझार सारख्या गाड्यांना पछाडले आहे.
ऑगस्ट महिन्यात १६ हजार ९१ मिड साईज एसयूव्ही वाहनांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या एसयूव्हींना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १२ हजार ५८९ वाहनांची विक्री झाली होती. त्या पेक्षा यावर्षीचा आकडा मोठा आहे. विक्रीमध्ये २७.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र जुलईच्या तुलनेत ऑगस्ट महिन्याची विक्री कमी आहे.
(सणासुदीच्या काळात हिरोच्या बाइक्स झाल्या महाग, कंपनीने इतक्या रुपयांची केली वाढ)
या एसयूव्हीने मारली बाजी
ऑगस्ट २०२२ मध्ये विक्रीच्या बाबती Mahindra XUV 700 ने बाजी मारली आहे. एक वर्षापूर्वी ही एक्सयूव्ही लाँच झाली होती. एक्सयूव्हीचा प्रतीक्षा कालावधी मोठा आहे. या वाहनासाठी १६ महिने वाट पाहावी लागेल. तरी देखील या एक्सयूव्हीला प्रचंड मागणी आहे. ऑगस्टमध्ये या वाहनाचे ६ हजार १० युनिट विकले गेले. मात्र जुलई महिन्याची आकडेवारी बघता विक्रीत थोडी घट झाल्याचे दिसून येते आहे. तरी मिड साईज एसयूव्हीमध्ये महिंद्राने मोठी मजल मारली आहे. दरम्यान महिंद्राने अलिकडेच चाहत्यांना निराश करणारा निर्णय घेतला आहे. खर्च वाढल्याचे सांगत महिंद्रा कंपनीने एक्सयूव्ही ७०० आणि थारच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.
(टाटाच्या ‘या’ ईव्हीमध्ये मिळणार हे भन्नाट फिचर, ब्रेक मारताच चार्ज होईल कार, जाणून घ्या..)
महिंद्रा एक्सयूव्ही नंतर या वाहनांची विक्री अधिक
एक्सयूव्ही नंतर विक्रीच्या बाबतीत दुसरे स्थान टाटा हॅरियरने पटकवले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या वाहनाच्या विक्रीत घट झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये हॅरियरच्या २ हजार ७४३ युनिटची विक्री झाली होती. मात्र यावर्षी आकडा घटून २ हजार ५९६ वर आला आहे. हॅरियर नंतर तिसरे स्थान ह्युंडाई अल्काजारने पटकवले आहे. हिच्या विक्रीत देखील घट झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये अल्काजारच्या ३ हजार ४६८ युनिटची विक्री झाली होती. मात्र या वर्षी ऑगस्ट महिन्यात केवळ २ हजार ३०४ युनिटची विक्री झाली आहे.