Waiting Period On Mahindra SUVs: भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचं एसयूव्ही सेगमेंटवर वर्चस्व आहे. सध्या भारतीय बाजारात महिंद्रा कंपनी या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या एसयूव्ही विकते. महिंद्राने अलीकडेच या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची घोषणा केली आहे. XUV700, Scorpio-N आणि Scorpio Classic यासह लोकप्रिय SUV वरील प्रतीक्षा कालावधी कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तिन्ही एसयूव्हीसाठी सध्या प्रचंड प्रतीक्षा कालावधी आहे. Scorpio-N बाबत परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आतापर्यंत, ज्यांनी बुकिंग सुरू केल्याच्या पहिल्या दिवशी बुकिंग केले होते, त्यापैकी अनेकांना स्कॉर्पिओ-एनची डिलिव्हरी मिळालेली नाही.
MAHINDRA XUV700 वर प्रतीक्षा कालावधी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, XUV700 एकूण ५ ट्रिम स्तरांमध्ये उपलब्ध आहे – MX, AX3, AX5, AX7 आणि AX7L. यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय मिळतात. त्याच्या MX आणि AX3 प्रकारांना अनुक्रमे ६ महिने आणि ७ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. AX5 ट्रिमसाठी प्रतीक्षा कालावधी ८ महिन्यांपर्यंत आहे. टॉप-स्पेक AX7 आणि AX7L ट्रिमसाठी १५ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे.
(हे ही वाचा : ६ Airbags सोबत येणाऱ्या देशातील ‘या’ ७ सीटर कारसमोर XUV700-Safari ही विसरुन जाल, किंमत… )
MAHINDRA SCORPIO N वर प्रतीक्षा कालावधी
नवीन Mahindra Scorpio N पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L ५ ट्रिम स्तरांमध्ये उपलब्ध आहे. सुरुवातीच्या ट्रिमसाठी सुमारे ११-१२ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. Z6 आणि Z8 ट्रिमसाठी सुमारे ११ ते १२ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. Z4 ट्रिमवर १७ ते १८ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. Z8L ट्रिमवर ८-९ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.
MAHINDRA SCORPIO CLASSIC वर प्रतीक्षा कालावधी
२००२ मध्ये लाँच झाल्यापासून स्कॉर्पिओ बाजारात विकल्या जाणार्या सर्वात लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे. SUV नुकतीच नवीन स्कॉर्पिओ क्लासिक म्हणून पुन्हा सादर करण्यात आली, ज्याला खरेदीदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन Scorpio Classic S आणि S11 या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सध्या दोन्ही प्रकारांसाठी ७ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे.