भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा भारतात त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कॉम्पॅक्ट एक्सयूव्ही ३०० चे फेसलिफ्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. महिंद्रा भारतीय बाजारपेठेत सर्वात स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक्सयूव्ही ३०० लाँच करण्याच्या विचारात आहे. आता देशांतर्गत ऑटोमेकर या सेगमेंटमध्ये आपले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी अधिक खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी ही अपडेटेड एसयुव्ही बाजारात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. २०१९ मध्ये सर्वात आधी ही गाडी लॉन्च झाल्यानंतर जवळजवळ पाच वर्षांनी म्हणजेच २०२४ च्या सुरुवातीला ही गाडी प्रत्यक्षात बाजारामध्ये दाखल होणार आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही ३०० फेसलिफ्टमध्ये “ट्विन पीक्स” लोगो (समोर आणि मागील), क्रोम-स्टडेड ग्रिल, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलाइट्स, सिल्व्हर स्किड प्लेट्स, एक रेक विंडस्क्रीन आणि समोर एक विस्तीर्ण एअर डॅमसह मस्कुलर बोनेट असा भन्नाट लूक देण्यात आला आहे. एसयूव्हीला साइड रूफ रेल, ओराव्हीएम, फ्लेर्ड व्हील आर्च आणि नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतील. या व्यतिरिक्त गाडीमध्ये रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स देखील मिळतील.
आणखी वाचा : टाटा मोटर्सची दमदार कामगिरी! एका महिन्यात विकल्या ‘इतक्या’ कार; आकडा वाचून व्हाल दंग…
इंजिन आणि किंमत
नवीन फेसलिफ्ट एक्सयूव्ही ३०० च्या तांत्रिक बाबी अद्याप समोर आलेल्या नाहीत. या एक्सयूव्हीला १.२ लीटरचे चांगले री-ट्यून केलेले पेट्रोल इंजिन दिले जाईल अशी अपेक्षा आहे, ज्याची कमाल १२८ बीएचपी पॉवर जनरेट करण्याची क्षमता असेल. याशिवाय, हे १.५ लीटर डिझेल इंजिनसह जे ११६.५ बीएचपी पॉवर जनरेट करण्याच्या क्षमतेचं असेल. अद्ययावत महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ची किंमत आणि उपलब्धता ७ ऑक्टोबर रोजी आयोजित इव्हेंट दरम्यान घोषित केली जाईल. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी प्रत्यक्षात २०२४ च्या सुरुवातीला बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.