Mahindra XUV400 Vs Tata Nexon EV Max:  प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्राच्या वाहनांना नागरिकांची प्रचंड पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये, महिंद्राने आपली नवीन ‘SUV Mahindra XUV400’ लाँच केली आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्स (Tata Motors) ही कंपनी चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये आधीपासूनच आपलं वर्चस्व निर्माण करुन बसली आहे. महिंद्राची Mhindra XUV400 टाटा मोटर्सच्या Tata Nexon EV Max ला जोरदार टक्कर देणार आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्रा XUV400 की Tata Nexon EV Max कोणती असेल तुमच्यासाठी खास हे आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.

Mahindra XUV400 Vs Tata Nexon EV Max कोणाची बॅटरी आहे दमदार

Mahindra XUV400 मध्ये, कंपनीने ३९.४ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे जो १५० bhp पॉवर आणि ३१० Nm पीक टॉर्क जनरेट करतो. टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स एका इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेल्या ४०.५ kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. हा बॅटरी पॅक १४३ PS पॉवर आणि २५० Nm पीक टॉर्क जनरेट करतो. Mahindra XUV 400 मधील बॅटरी पॅकची क्षमता Tata Nexon EV Max पेक्षा कमी आहे परंतु जास्त पॉवर आणि पीक टॉर्क जनरेट करते.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार

(हे ही वाचा : TVS Ronin की Keeway SR 250 कोणती बाईक धावणार सुसाट, पाहा फीचर, किंमत अन् इंजिनपासून सर्वकाही… )

Mahindra XUV400 Vs Tata Nexon EV Max कोणत्या कारची रेंज चांगली? 

महिंद्राचा दावा आहे की XUV 400 EV एका चार्जवर ४५६ किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते. दुसरीकडे, टाटा मोटर्सचा दावा आहे की, नेक्सॉन ईव्ही मॅक्स एका चार्जवर ४३७ किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते. ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत, दोन्ही कंपन्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवला तर, महिंद्रा XUV400 टाटा नेक्सॉनपेक्षा १९ किलोमीटर पुढे आहे.

Mahindra XUV400 Vs Tata Nexon EV Max जो चार्जिंगमध्ये कोण आहे फास्ट

Mahindra XUV 400 मध्ये कंपनीने ७.२ kW चा चार्जर दिला आहे जो सहा तासांत बॅटरी पूर्णपणे चार्ज करतो. होम चार्जर व्यतिरिक्त, कंपनीने 50 kW DC फास्ट चार्जरचा पर्याय देखील दिला आहे जो ५० मिनिटांत ०-८० टक्के बॅटरी चार्ज करू शकतो.

कंपनीने Tata Nexon EV Max मध्ये तीन चार्जिंग पर्याय दिले आहेत, ज्यामध्ये पहिला चार्जर ३.३ kW, दुसरा ७.२ kW आणि तिसरा ५० kW DC फास्ट चार्जर आहे. ३.३ किलोवॅटच्या चार्जरने १५ तासांत आणि ७.२ किलोवॅटच्या चार्जरने ६ तासांत बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते. बॅटरी पॅक 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ५६ मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज केला जाऊ शकतो.

(हे ही वाचा : Tata Altroz Racer की Hyundai i20 N-Line? कोणती कार आहे सर्वाधिक दमदार, वाचा फीचर्स अन् बरचं काही )

Mahindra XUV400 Vs Tata Nexon EV Max किंमतीतील फरक

कंपनीने महिंद्रा XUV400 हे माॅडेल १५.९९ लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) मध्ये सादर केले आहे आणि टॉप व्हेरियंटमध्ये ही किंमत १८.९९ लाख रुपयांपर्यंत जाते. Tata Nexon ची किंमत १८.३४ लाखापासून सुरू होते जी टॉप मॉडेलसाठी २०.०४ लाखांपर्यंत जाते. किंमतीच्या बाबतीत, Mahindra XUV400 नेक्सॉन पेक्षा सुमारे २.५ लाख रुपये स्वस्त आहे.

Story img Loader