Mahindra XUV700 Gets A Price Cut: महिंद्राने आपल्या लोकप्रिय SUV XUV700 ची किंमत कमी केली आहे. महिंद्राची ही पॉवरफूल एसयूव्ही ७५ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. XUV700 पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही कार ६-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनसह येते. ऑटोमेकर्सनी अलीकडेच इंडियन मार्केटमध्ये XUV700 चे इबोनी व्हर्जन लाँच केले आहे. गुढी पाडव्याला नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आजच बूक करा ही कार.

SUV XUV700 कोणते व्हेरिएंट झाले स्वस्त?

ऑटो क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने XUV700 अधिक परवडणारी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राने XUV700 चे काही व्हेरिएंट ७५ हजार रुपयांनी तर काही व्हेरिएंट ४५ हजार रुपयांनी स्वस्त केले आहे. स्वस्त झालेल्या व्हेरिएंटमध्ये AX7 L पेट्रोल AT 7S, AX7 L पेट्रोल AT 6S, AX7 L डिझेल MT 7S, AX7 L डिझेल AT 7S, AX7 L डिझेल MT 6S, AX7 L डिझेल AT 6S आणि AX7 L डिझेल AWD AT 7S चा समावेश आहे.

महिंद्रा XUV700: वैशिष्ट्ये

महिंद्रा XUV700 मध्ये २६.०३ सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि कारप्ले, इन्फोटेनमेंट फंक्शन्समध्ये प्रवेश करण्यासाठी रोटरी नॉब, सोनीचा १२-स्पीकर सेटअप, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्क असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ३६०-डिग्री कॅमेरा सेटअप, ड्रायव्हर ड्रॉन्ड्रंसी अलर्ट आणि बरेच काही अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

महिंद्रा XUV700: किंमती

महिंद्रा वेबसाइटनुसार, XUV700 सध्या AX7 साठी १९.४९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे आणि AX7 L डिझेल AT साठी २४.९९ लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्रा ने XUV700 इबोनी एडिशन देखील लाँच केले ज्यामध्ये १८-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स, ब्लॅक-आउट ORVM, ब्लॅक लेदर अपहोल्स्टर, ब्लॅक-आउट ग्रिल आणि बरेच काही असलेले पूर्णपणे ब्लॅक थीम आहे. XUV700 इबोनी एडिशनच्या किमती १९.६४ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होतात.

Story img Loader