देशातील इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असून आता कंपन्यांसह ग्राहकांनीही या वाहनांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान आणि मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत आता महिंद्रा आपली नवीन स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. परंतु अजूनतरी महिंद्राकडून या कारच्या अधिकृत लाँच बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, Mahindra Atom Electric Car पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाईल. याआधी ही कार ऑटो एक्सपो २०२० मध्ये सादर करण्यात आली होती. ही एक मिनी कार असेल. अलीकडेच लीक झालेल्या RTO डॉक्यूमेंटमधून या मिनी ईव्हीबाबत काही महत्वाची माहिती समोर आली आहे, चला जाणून घेऊया.

आणखी वाचा : Nissan इंडियाने ग्राहकांना दिली दिवाळी भेट; बाजारपेठेत लाँच करणार ‘या’ तीन जबरदस्त SUV कार

चार व्हेरिएंटमध्ये लाँच होणार

महिंद्र अ‍ॅटम क्वॉड्रिसायकल स्वरूपात डिजाइन करण्यात आली आहे, ज्यात फक्त चार लोक बसू शकतात. रशलेनच्या रिपोर्टनुसार Mahindra Atom चार प्रकारांमध्ये लॉन्च केले जाईल. K1, K2, K3 आणि K4, पहिले दोन प्रकार ७.४ kWh बॅटरी पॅकसह येतील, तर इतर दोन शक्तिशाली ११.२ kWh बॅटरी पॅकसह येतील. महिंद्रा अ‍ॅटम K1 आणि K2 K3 आणि K4 च्या तुलनेत कमी रेंज देईल. महिंद्रा अ‍ॅटमचं कर्ब वेट व्हेरिएंटच्या आधारावर ४३४ किलोग्राम ते ४५८ किलोग्राम दरम्यान असेल. महिंद्रा अ‍ॅटमचा कमाल वेग ५० किमी/तास असेल आणि ती पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ५ तास लागतील.

किंमत

महिंद्रा अ‍ॅटमची लांबी २,७२८ एमएम, रुंदी १,४५२ एमएम आणि उंची १, ५७६ एमएम असेल. तसेच हीच व्हीलबेस १,८८५ एमएम असेल. महिंद्रा अ‍ॅटमचा लूक आणि फीचर्स आकर्षक आहेतच, शिवाय तिची किंमतही खूपच कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कारची किंमत सुमारे ३ ते ५ लाख रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे.

Story img Loader