Mahindra XUV400 Booking: Tata Nexon EV ही सध्या भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. महिंद्राने अलीकडेच आपली इलेक्ट्रिक SUV XUV400 लाँच केली आणि २६ जानेवारीपासून तिची बुकिंग सुरू केली. महिंद्राच्या एसयूव्हीची ग्राहकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, अवघ्या ५ दिवसांत या वाहनाला १०,००० हून अधिक बुकिंग झाले. म्हणजे दररोज सुमारे २००० लोक त्याचे बुकिंग करत आहेत. टाटा नेक्सॉन ईव्हीने वर्षांनंतरही केवळ ३५ ते ४०,००० युनिट्सची विक्री केली आहे.
Mahindra XUV400 किंमत
Mahindra XUV400 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV आहे. हे फक्त दोन प्रकारात येते. त्याची किंमत १६ लाख ते १९ लाख रुपयांपर्यंत आहे. ही किंमत सुरुवातीच्या ५००० बुकिंगसाठीच राहील, असे कंपनीने म्हटले असले तरी, आता कंपनी किंमत वाढवू शकते, असे मानले जात आहे. महिंद्राने असेही जाहीर केले की ते या वर्षीच सुरुवातीच्या २०,००० युनिट्सची डिलिव्हरी करेल.
(हे ही वाचा : Tata च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने २.५ वर्षांत केली तब्बल १४ लाख रुपयांची बचत, बॅटरीमध्येही आली नाही अडचण )
Mahindra XUV400 Electric SUV ‘अशी’ आहे खास
XUV 400 ही नवी इलेक्ट्रिक कार XUV 300 वर आधारित आहे. पण या नव्या कारचा लूक वेगळा आहे. यात नवीन डिझाइन केलेले टेलगेट आणि बंपर डिझाइन वापरण्यात आले आहे. तसेच त्याची टेललॅम्प डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आली आहे. यामध्ये नवीन हेडलाइट्स, क्लोज्ड फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्स आहेत. या कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. ३५०V आणि ३८०V चे पॉवरट्रेन उपलब्ध आहेत.
बॅटरी फीचर्स
याच्या छोट्या बॅटरीची रेंज कमी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ३०० ते ३५० किलोमीटरचे अंतर पार करू शकते. मोठी बॅटरी यापेक्षा अधिक अंतर पार करू शकते. या कारची तुलना टाटाच्या नेक्सॉन ईवीशी केली जात आहे.