Milk Delivery On Harley Davidson Street 750: आजकाल सोशल मीडियावर विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. ज्या इंटरनेटवरही खूप पसंत केल्या जातात. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकताच एक व्यक्ती दूध विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे हा व्यक्ती चक्क ५ लाखांच्या मोटारसायकलवर दूध विकताना दिसत आहे.
नुकताच इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दूध विकताना दिसत आहे. या व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे ज्या बाईकवर ती व्यक्ती दूध विकत आहे त्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. त्यामुळे या दूधविक्रेत्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.
(हे ही वाचा : अन् ‘Bajaj Pulsar 150’ बाईकवर जोडप्याचा रोमान्स सुसाट, ‘हे’ कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल लाज )
दूध विक्रेत्याकडे कोणती मोटरसायकल आहे?
या व्हिडीओमध्ये दूध विक्रेत्याजवळ काळ्या रंगाची Harley Davidson Street 750 दिसत आहे. Harley Davidson Street 750 ला ५.५६ लाख (एक्स शोरूम) किंमतीत भारतात लाँच करण्यात आले आहे. या बाइकमध्ये ७४९ सीसी व्ही ट्विन इंजिन दिले आहे. हे इंजिन ४७ पीएसचे पॉवर आणि ५९ एनएमचे टॉर्क जनरेट करते. या मोटारसायकलमध्ये उत्तम फीचर्स मिळण्यासोबतच तिची कामगिरीही मजबूत आहे. या आलिशान मोटारसायकलवर दूध विकणे सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ
जवळपास मिळाले २ लाख लाईक्स
इंस्टाग्रामवर एका वापरकर्त्याने गेल्या महिन्यात या माणसाचा मोटरसायकलवर दूध विकत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता, जो काही वेळातच व्हायरल झाला होता. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत १,९८,१८० लाईक्स मिळाले आहेत.