लक्झरी कार निर्माती कंपनी असणाऱ्या Aston Martin ने आपल्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली कार लॉन्च केली आहे. कंपनीने DBS 770 Ultimate Volante हे शक्तिशाली मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनी लवकरच बीएस मॉडेल बंद करणार आहे. हा त्याचा शेवटचा प्रकार असेल. कंपनी या ओपन-टॉप सुपरकारचे फक्त १९९ युनिट्स तयार करणार आहेत. DBS चा हा नवीन प्रकार कंपनीने ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त लॉन्च केला आहे.

कसे असणार या कारचे डिझाईन ?

DBS 770 Ultimate Volante या कारमध्ये ग्राहकांना २+२ असे स्पोर्टी ४ सीटर केबिन मिळते. याचे केबिन हे लेदर, कार्बन फायबर यापासून तयार करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सुपरकारचे डिझाईन सध्याच्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. याशिवाय, त्यात दिलेले U-shaped vents सह एक लांब क्लॅमशेल हुड त्याला नवीन रूप देण्याचे काम करते. याशिवाय, नवीन कारला DRLs, मोठ्या ग्रिल, एअर स्प्लिटर, ORVMs, स्लीक टेल लाइट्स आणि डिफ्यूझर रियर एंडसह स्वीपबॅक एलईडी हेडलाइट्स मिळतात.

Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?

हेही वाचा : Tata Motor Price Hike: ग्राहकांसाठी मोठी बातमी! टाटा मोटर्स आपल्या कारच्या किंमतीत ‘या’ तारखेपासून करणार वाढ

कसे असणार इंजिन ?

कंपनीने आपल्या Aston Martin DBS 770 Ultimate Volante लक्झरी स्पोर्ट्स कारमध्ये शक्तिशाली 5.2-L twin-turbocharged V12 इंजिन दिले आहे. जे जास्तीत जास्त ७९५ HP ची पॉवर आणि ९०० NM चा टॉर्क जनरेट करते. जे ट्रान्समिशनसाठी ZF 8-स्पीड ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

याशिवाय या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पॅनल आणि ADAS हे फिचर देखील मिळतात. उत्तम ड्रायव्हिंगसाठी स्टीयरिंग आणि सस्पेन्शन सिस्टीममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या कारमध्ये उत्तम नियंत्रणासाठी कार्बन सिरॅमिक ब्रेकचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Nissan Motor India ग्राहकांसाठी करणार ‘हा’ कॅम्प मोफत; जाणून घ्या काय असणार खास

किती असणार किंमत ?

नवीन लॉन्च झालेल्या DBS 770 Ultimate Volante या मॉडेलची किंमत ३.३७ लाख पौंड (भारतीय किंमत- सुमारे ३. ४४ कोटी रुपये ) इतकी आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या वाहनांबद्दल बोललो तर DBS 770 Ultimate Volante मॉडेल २०२२ च्या च्या Bentley Continental GT Speed Convertible शी स्पर्धा करेल.

Story img Loader