अलिकडच्या वर्षांत देशातील कार क्षेत्रातील सीएनजी कारची मागणी झपाट्याने वाढली आहे आणि ही मागणी लक्षात घेऊन कार उत्पादकांनी त्यांच्या सध्याच्या कारच्या सीएनजी वर्जनही सुरू केल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे सीएनजी कारची मोठी रेंज देशातील बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे.

बाजारात सीएनजी कारच्या मोठ्या रेंजमध्ये आम्ही देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार मारुती अल्टोबद्दल बोलत आहोत, जी कमी किंमत आणि पेट्रोल-सीएनजीवरील मायलेजमुळे खूप पसंत केली जाते.

Maruti Alto CNG 800 ची किंमत ५,०३,००० (एक्स-शोरूम, दिल्ली) रूपयांपासून सुरू होते, जी ऑन रोड असताना ५,६८,२७० रूपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला मारुती अल्टो सीएनजी घ्यायची असेल, पण तुमचे बजेट ५ लाख नसेल तर ते खरेदी करण्यासाठी इथे सोप्या फायनान्स प्लॅनबद्दले जाणून घ्या.

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही मारुती अल्टो सीएनजी खरेदी केली तर बँक यासाठी ५,११,२७० रुपये कर्ज देईल.

आणखी वाचा : फक्त ५ लाखात घेऊन जा Mahindra Thar, वाचा संपूर्ण ऑफर

हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ५७,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर दरमहा १०,८१३ रुपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.

मारुती अल्टो सीएनजीवर दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या ५ वर्षात बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

आणखी वाचा : Odysse Hawk इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर १७० किमी रेंज देते, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

या कर्जाचे तपशील, डाउन पेमेंट आणि फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध EMI प्लॅनचे तपशील वाचल्यानंतर, तुम्हाला या मारुती अल्टोच्या इंजिन आणि मायलेजचे संपूर्ण तपशील माहित असणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात…

मारुती अल्टो सीएनजीमध्ये कंपनीने ७९६ सीसी तीन-सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ४०.३६ bhp पॉवर आणि ६० Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बसवले आहे.

मारुती अल्टो सीएनजीच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार ३१.५९ किमी प्रति किलो मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Story img Loader