कार सेक्टरच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये कमी बजेटच्या कारची मोठी रेंज आहे, ज्यांना त्यांच्या किंमतीव्यतिरिक्त त्यांच्या मायलेज आणि फीचर्ससाठी प्राधान्य दिलं जातं. कमी बजेटच्या कारच्या सध्याच्या रेंजमध्ये आम्ही देशातील सर्वात स्वस्त कार मारुती अल्टोच्या सीएनजी व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत, जी तिच्या मायलेजसाठी पसंत केली जाते.
तुम्ही नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती अल्टो 800 चे सीएनजी व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी उपयोगी पडणारा हा अतिशय सोपा फायनान्स प्लॅन जाणून घेऊया.
Maruti Alto 800 S CNG ची सुरुवातीची किंमत ५,०३,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड असताना ५,६८, २७० रुपयांपर्यंत जाते, परंतु या प्लॅनद्वारे तुम्ही ही कार फक्त ५७ हजार रुपये देऊन घरी नेऊ शकता.
ऑनलाइन उपलब्ध डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला हा मारुती अल्टो सीएनजी फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करायचा असेल, तर बँक त्यासाठी ५,११,२७० रुपये कर्ज देईल.
आणखी वाचा : Triumph लवकरच लॉंच करणार नवीन इलेक्ट्रिक बाईक, लाँग रेंजसह आक्रमक स्ट्रीट फायटर लूक, वाचा संपूर्ण माहिती
हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ५७,००० रूपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर दरमहा १०,८१३ रुपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.
मारुती अल्टो ८०० सीएनजीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या ५ वर्षांमध्ये बँक कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.
आणखी वाचा : १२ लाखाची Mahindra XUV 500 केवळ ५ लाखांमध्ये मिळतेय, जाणून घ्या कुठे आणि काय ऑफर आहे?
फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि ईएमआय प्लॅनचे तपशील वाचल्यानंतर, तुम्हाला या मारुती अल्टो 800 सीएनजीच्या इंजिनपासून मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील माहित असणं गरजेचं आहे.
मारुती अल्टो 800 CNG च्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने त्यात ७९६ cc तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन १०.३६ PS ची पॉवर आणि ६० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही मारुती अल्टो 800 CNG ३१.५९ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.