प्रत्येजकणाचा स्वप्न असताे की त्यांच्याकडे स्वत:ची कार असावी, पण कमी बजेटमुळे वाहन खरेदी करणे शक्य होत नाही. पण चिंता करु नका, आता आम्ही तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये तुम्हाला कार कशी खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुतीची कार तुम्हाला कमी पैशात घरी आणता येणार आहे. जी ३५Km पर्यंत मायलेज देऊ शकते आणि ज्याची देखभाल महिन्याला सुमारे ५०० रुपये आहे. जर या कारच्या बेस व्हेरियंटवर १०० टक्के फायनान्स केले गेले, तर ती सुमारे सात हजार रुपयाच्या EMI वर घरी आणली जाऊ शकते. ही मारुती सुझुकी अल्टो K10 आहे. हे पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ही पाच सीटर कार आहे.

(हे ही वाचा : आता भारतातच होणार वाहनांची क्रॅश टेस्ट, नितीन गडकरींच्या हस्ते ‘भारत एनसीएपी’चा शुभारंभ )

ही कार पेट्रोलवर २५ किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते, तर सीएनजीवर ही कार ३५ किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देते. त्याची देखभालही खूप कमी आहे.

फायनान्स प्लॅन

Alto K10 च्या बेस मॉडेलची किंमत ३.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याची ऑन-रोड किंमत सुमारे ४.४१ लाख रुपये आहे. जर तुम्ही त्याच्या ऑन-रोड किमतीवर (पूर्ण किमतीचे कर्ज) ७ वर्षांसाठी ९ टक्के व्याजदराने कर्ज घेतले, तर EMI सुमारे रु.७,१०८ असेल.