Car Sales: मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे, ज्यांच्या सात कार दर महिन्याला टॉप १० सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये समाविष्ट केल्या जातात. मे महिन्यात, मारुती सुझुकी बलेनो १८,७३३ युनिट्सची विक्री करत देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. दुसऱ्या स्थानावर मारुती सुझुकी स्विफ्ट तर तिसऱ्या स्थानावर मारुती सुझुकी वॅगनआर आहे. मात्र, कंपनीच्या परवडणाऱ्या कारच्या विक्रीत अचानक मोठी घट झाली आहे. या कारचा याआधी टॉप लिस्टमध्ये समावेश होता, पण मे महिन्यात ती विक्रीत तेराव्या स्थानावर घसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती मारुती सुझुकी अल्टो आहे. मे महिन्यात त्याच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, देशातील सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार होती. मात्र, महिनाभरानंतर म्हणजेच मे महिन्यात ते तेराव्या क्रमांकावर आले आहे. गेल्या महिन्यात केवळ ९,३६८ युनिट्सची विक्री झाली. एका वर्षापूर्वी (मे २०२२) त्याची १२,९३३ युनिट्स विकली गेली. म्हणजेच अल्टोच्या विक्रीत २८ टक्क्यांची घट झाली आहे. नुकत्याच लाँच झालेल्या मारुती फ्रँक्सने मे महिन्यात अल्टोला मागे टाकले आहे.

(हे ही वाचा : Innova-Carens सोडून, CNG मध्ये उपलब्ध असलेली ‘ही’ ७ सीटर कार खरेदीसाठी ग्राहकांची उडाली शोरूम्सवर झुंबड )

अल्टोच्या विक्रीत घट होण्याचे कारण काय?

मारुती सुझुकीने अल्टोच्या विक्रीत घट होण्याचे कारण स्पष्ट केले आहे. खरं तर, कंपनीने यापूर्वी अल्टोची दोन मॉडेल्समध्ये विक्री केली होती, ज्यात मारुती अल्टो ८०० आणि मारुती अल्टो K१० यांचा समावेश आहे. आता कंपनीने Alto ८०० बंद केली आहे. १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेले BS6 फेज २ उत्सर्जन नियम हे बंद होण्याचे कारण आहे.

कॅब चालकांसाठी नवीन अल्टो

कंपनीने अलीकडेच आपल्या Alto K10 चा नवीन अवतार, Alto Tour H1 लाँच केला आहे. हे खास कॅब चालकांसाठी बनवले आहे. त्याची किंमत ४.८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे पेट्रोलसह CNG आवृत्तीमध्ये देखील येते, ज्याची किंमत ५.७ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti alto which once topped the sales list has slipped to the 13th position today as of may 2023 9368 units of maruti alto have been sold pdb
First published on: 26-06-2023 at 13:40 IST