मारुती सुझुकी लवकरच आपली सर्वाधिक विक्री होणारी प्रीमियम हॅचबॅक बलेनो CNG व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. याची विक्री कंपनीच्या नेक्सा चेनच्या डीलरशिपद्वारे केली जाईल. मारुतीच्या नेक्सा चेनमध्ये अद्याप कोणतीही सीएनजी कार नव्हती, त्यामुळे मारुती बलेनोची सीएनजी व्हेरिएंट कार ही नेक्साची पहिली सीएनजी कार असेल. त्याचवेळी मारुतीने काही वर्षांपूर्वी डिझेल कारचे उत्पादन बंद केले होते. तेव्हापासून कंपनी कारचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करण्यावर भर देत आहे. कारण पेट्रोल-डिझेल कारपेक्षा सीएनजी कारची किंमत कमी आहे.
मारुती सुझुकीचे मार्केटिंग आणि सेल्सचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर शशांक श्रीवास्त यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, कंपनी बलेनोचे सीएनजी व्हेरिएंट लवकरच लॉन्च करण्याचा विचार करत आहे. ते म्हणाले की कंपनीने नेक्साच्या शोरूममधून सीएनजी कारच्या विक्रीची कल्पना केलेली नाही, परंतु ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपनी आपल्या धोरणात बदल करणार आहे. पण, मारुती बलेनो सीएनजी अद्याप निश्चित झालेली नाही, असेही ते म्हणाले. तसंच, मारुती नेक्साच्या माध्यमातून आणखी काही सीएनजी व्हेरिएंट आणण्याची तयारी करत आहे.
यासोबतच शशांक श्रीवास्त म्हणाले की, ग्राहक सीएनजीला पेट्रोल आणि डिझेलसाठी चांगला ऑप्शन मानतात. कारण यावर वाहन चालवण्याचा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या एक तृतीयांश इतका येतो. मारुती सुझुकी नेक्सा आणि एरिना या दोन डीलर चेनद्वारे कार विकते. बलेनो व्यतिरिक्त इग्निस, सियाझ, XL6 आणि S-Cross कार नेक्सा मार्फत विकल्या जातात. यापैकी कोणत्याही वाहनात सध्या CNG प्रकार उपलब्ध नाही. परंतु Alto, WagonR, Celerio, DZire आणि Atriga सारखी मॉडेल्स Arena डीलर चेनमध्ये CNG व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : ११ लाख नव्हे केवळ ३ ते ५ लाखात खरेदी करा Maruti Ciaz, जाणून घ्या ऑफर
CNG व्हेरिएंटमधील एकूण प्रवासी वाहनांमध्ये मारुतीचा सध्या ८ टक्के वाटा आहे, जो कंपनीच्या एकूण विक्रीच्या १५ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये मारुतीने CNG कारच्या एकूण १०६,००० युनिट्सची विक्री केली. जे आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ५४ टक्क्यांनी वाढून १६३,००० युनिट्सवर पोहोचले. कंपनीने चालू आर्थिक वर्षात सीएनजी कारच्या २४०,००० युनिट्सच्या विक्रीचे टार्गेट ठेवले आहे, जे डिसेंबरपर्यंत १५०,००० लाख युनिट्सवर पोहोचले आहे.
मारुती सुझुकी ही सीएनजी कार सेगमेंटमध्ये प्रवेश करणारी पहिली कंपनी ठरली आहे. सध्या, Hyundai Motor India चार CNG मॉडेल्स, Santro, Grand i10, Xcent आणि Aura विकते. तर टाटा मोटर्स Tiago ICNG, Tigor ICNG सारखी मॉडेल्स विकते. अशा परिस्थितीत मारुती आता आपल्या लक्झरी कार सेगमेंटमध्ये सीएनजी कारचा पर्याय देऊ करत आहे.