मारुती सुझुकी ब्रेझा ही कार तिच्या सेगमेंटमधील नंबर १ एसयूव्ही बनली आहे. या कारने अनेक महिन्यांपासून बाजारात नंबर १ असलेल्या टाटा नेक्सॉनवर मात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेझाची विक्री नेक्सॉनपेक्षा उत्तम असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळालं आहे. परंतु या कारला असलेली तगडी डिमांड ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. कारण एप्रिल महिन्यापर्यंत या कारवरील वेटिंग पीरियड १५० दिवस म्हणजेच पाच महिने इतका होता. जो आता ३०० दिवसांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच तुम्ही मारुती सुझुकी ब्रेझा कार आज बूक केली तर तुम्हाला कारच्या डिलीव्हरीसाठी तब्बल १० महिने वाट पाहावी लागेल.
मार्च महिन्यात कंपनीला या कारसाठी १६ हजारांहून अधिक बूकिंग्स प्राप्त झाल्या आहेत. या कारसाठी मोठा वेटिंग पीरियड असूनही ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लाईन लागलेली आहे. न्यू ब्रेझा कारच्या न्यू जनरेशन के-सिरीज व्हेरिएंटमध्ये १.५ लीटर डुअल जेट WT इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज आहे. यात ६ स्पीड ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन १०३ बीएचपी पॉवर आणि १३७ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं.
कंपनीने दावा केला आहे की, या कारची इंधन कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे. या कारचं मॅन्युअल व्हेरिएंट २०.१५ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देतं. तर या कारचं ऑटोमॅटिक व्हेरिएंट १९.८० किमी प्रति लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा एकूण चार ट्रिम्समध्ये येते.
हे ही वाचा >> Royal Enfield ची होणार सुट्टी? Yamaha देशात नव्या अवतारात दाखल करतेय ‘ही’ लोकप्रिय बाईक? फीचर्स असतील…
ऑल-न्यू हॉट ब्रेझा कारमध्ये बलेनो कारसारखा ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. हा हायटेक आणि मल्टी इन्फॉर्मेशन देणारा कॅमेरा आहे. यासह ९ इंचांची स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यात कंपनीने वायरलेस चार्जिंग डॉक दिला आहे. याद्वारे वायरलेस फोन सहज चार्ज करता येईल. तसेच यात मारुती कनेक्ट फीचर्सचा भरणा आहे.