Maruti Suzuki Discount Offers: तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातली सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकी आपल्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी कार तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे, चला तर पाहूया कोणती आहे ही कार…
मारुतीच्या ‘या’ कारवर मिळतोय बम्पर डिस्काउंट
Maruti Celerio वर प्रचंड सवलत देत आहे. ही सूट फक्त दोन दिवसांसाठी आहे. ३० जूनपर्यंत कंपनी Celerio वर ५४,००० रुपयांची सूट देत आहे.
कंपनी मारुती सेलेरियोचे चार प्रकार ऑफर करते आणि त्या सर्वांवर ही सूट कॉर्पोरेट, रोख आणि एक्सचेंज बोनसच्या रूपात दिली जात आहे. तथापि, ऑटोमॅटिक व्हेरियंटवर सूट रक्कम थोडी कमी आहे.
(हे ही वाचा : केवळ ३० जणांच्या नशिबात आहे ‘ही’ जबरदस्त फीचर्सने रंगलेली कार, सीटला फोल्ड करुन बनवा बेड, अन् किमतही… )
कंपनी Celerio च्या LXI, VXI, ZXI आणि ZXI+ च्या मॅन्युअल व्हेरियंटवर रु. ३५,००० रोख सूट, रु. १५,००० एक्सचेंज बोनस आणि रु. ४,००० कॉर्पोरेट सूट देत आहे. विशेष म्हणजे Celerio ची सुरुवातीची किंमत ५.३७ लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ७.१४ लाख रुपये आहे.
त्याच वेळी, कारच्या AMT प्रकारावर सूट देखील दिली जात आहे. कंपनी Celerio ऑटोमॅटिकवर २९,००० रुपयांची सूट देत आहे. यामध्ये रु. १०,००० रोख, रु. १५,००० एक्सचेंज बोनस आणि रु. ४,००० कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. सेलेरियोची सेल कंपनी मारुती सुझुकीच्या एरिना डीलरशिपद्वारे करते.
मायलेज
कारचे पेट्रोल व्हेरिएंट २६.६८ kmpl मायलेज देते. त्याच वेळी, त्याचे CNG मॉडेल एक किलो गॅसमध्ये ३५.६ किमी मायलेज देते.