Maruti Suzuki New Car: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार देशभरात पसंत केल्या जातात. मारुती डिझायर ही कंपनीची लोकप्रिय कार आहे. मारुतीच्या या कारला देशातील बाजारात खूप मागणी आहे. आता मारुती सुझुकी आपल्या सर्वात लोकप्रिय सेडान कार डिझायरचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकी डिझायर लवकरच तुम्हाला नव्या अवतारात दिसणार आहे. मारुती सुझुकी डिझायर ही कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. चाचणी दरम्यान डिझायर अनेक वेळा दिसले आहे. नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला काही खास आणि काय नवीन पाहायला मिळेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊया…
प्राप्त माहितीनुसार, मारुती सुझुकी नवीन डिझायरच्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल करू शकते. त्याच्या समोर एक नवीन बोनेट, बंपर आणि हेड लाइट्स दिसू शकतात. याशिवाय कारच्या साईड प्रोफाइलवरही काम केले जाणार आहे. नवीन डिझायरच्या मागील लूकमध्येही बदल करण्यास पूर्ण वाव आहे. नवीन बंपर आणि LED टेल लाईट्स येथे देखील मिळू शकतात. यावेळी नवीन Dezire ला नवीन Z-Series तीन सिलिंडर इंजिन मिळेल जे ८२ hp ची पॉवर आणि ११२ Nm टॉर्क देईल. नवीन Dezire CNG मध्ये देखील ऑफर केली जाईल, ज्याचे मायलेज ३०km/kg पर्यंत असू शकते.
पण कारमध्ये फक्त एकच सीएनजी टाकी दिली जाईल, अशी माहिती आहे. सीएनजी सिलिंडरशिवाय ३७८ लिटरची मोठी बूट स्पेस मिळू शकते. तसेच डिझायरमध्ये बसवलेले इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड AMT गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. मायलेजच्या बाबतीत इंजिन खूपच चांगले असणार आहे. नवीन डिझायरच्या इंटीरियरमध्येही मोठे बदल केले जाऊ शकतात. त्याची केबिन राखाडी आणि बेज रंगांमध्ये आढळू शकते. यामध्ये एक नवीन क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम पाहता येईल. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देखील मिळू शकतात.
(हे ही वाचा : ह्युंदाईने खेळला नवा गेम; बाजारपेठेत दाखल करण्यापूर्वीच ‘या’ ७ सीटर SUV ची बुकींग केली सुरु, किती मोजावे लागणार पैसे?)
वैशिष्ट्ये
- ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन
- ६ एअरबॅग्ज
- अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम
- पेट्रोल आणि सीएनजी पर्याय
- फ्रंट-व्हील ड्राइव्ह
- ४ पॉवर विंडो
नवीन मारुती डिझायर ADAS सह येऊ शकते. नवीन Dezire मध्ये सुरक्षिततेसाठी, ADAS (Advanced Driving Assistance Systems) कारमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये आढळू शकतात. सूत्रानुसार, नवीन मारुती डिझायर आता १५ सप्टेंबर रोजी लाँच केली जाऊ शकते. मात्र अद्याप या लॉन्चबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्याच्या डिझायरची एक्स-शोरूम किंमत ६.५६ लाख रुपयांपासून सुरू होते, परंतु नवीन डिझायरची किंमत थोडी जास्त असू शकते. १० लाखाच्या आतमध्ये या कारची किंमत ठेवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.