देशात अलिकडच्या काळात किफायतशीर हॅचबॅक आणि एसयूव्हींच्या विक्रीत वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सेडान कार्सच्या विक्रीत थोडी घट झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये सेडान सेगमेंटमधील वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.५१ टक्के घट झाली आहे. या सेगमेंटमध्ये गेल्या महिन्यात देशात ३१,७३७ वाहनांची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी या सेगमेंटमधील ३४,३१४ वाहनांची विक्री केली होती. या सेगमेंटमधील ३-४ मॉडेल्सची विक्री उत्तम सुरू आहे. तर काही वाहनांना ग्राहकांकडून पसंती मिळणं कमी झालं आहे. मारुती सुझुकी डिझायर ही या सेगमेंटमधील नंबर वन कार आहे.
देशात सेडान कार्सच्या सेगमेंटमध्ये मारुती डिझायरसह होंडा अमेझ, ह्युंदाई ऑरा आणि टाटा टिगॉर या कार्सची विक्री जैसे थे स्थितीत आहे. गेल्या महिन्याच्या विक्रीबद्दल बोलायचं झाल्यास जानेवारी २०२३ मध्ये मारुतीने डिझायरच्या एकूण ११,३१६ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात या कारच्या १४,९६७ युनिट्सची विक्री झाली होती. डिझायरच्या विक्रीत मोठी घट झाली असली तरी या कारने बाजारातलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
डिझायरच्या तुलनेत होंडा अमेझ, ह्युंदाई ऑरा, टाटा टिगॉर, होंडा सिटी, स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन वर्ट्स, मारुती सिय़ाझ, ह्युंदाई वर्ना, स्कोडा ऑक्टाव्हिया, स्कोडा सुपर्ब, टोयोटा कॅमरी या कार्स मागे राहिल्या आहेत.
हे ही वाचा >> Renault च्या ‘या’ लोकप्रिय कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, कंपनीने घेतला मोठा निर्णय
गेल्या महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप १० सेडान कार्स
१. मारुती डिझायर – ११,३१७ युनिट्स
२. होंडा अमेझ – ५,५८० युनिट्स
३. ह्युंदाई ऑरा – ४,६३४ युनिट्स
४. टाटा टिगॉर – ३,१०६ युनिट्स
५. होंडा सिटी – २,०५८ युनिट्स
६. स्कोडा स्लाव्हिया – १,४१३ युनिट्स
७. फोक्सवॅगन वर्ट्स – १,३७९ युनिट्स
८. मारुती सियाज – १,००० युनिट्स
९. ह्युंदाई वेर्ना – ९९५ युनिट्स
१०. स्कोडा ऑक्टाव्हिया – १०० युनिट्स