Maruti Car Sales: देशातील ऑटो बाजारात आज मोठ्या प्रमाणात सेडान कार्सना मागणी आहे. भारतात सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार आणि भारतातील सर्वात स्वस्त सेडान कार कोणती आहे माहितेय का ? या दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आहे, मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire). भारतातील सर्वात स्वस्त सेडान असण्यासोबतच ही सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार देखील आहे. देशातील टॉप-१० सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत हे सहसा समाविष्ट केले जाते. परंतु, एप्रिल महिन्यात (२०२३) ती या यादीतून बाहेर पडली आणि अकराव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.

किंबहुना, मारुती सुझुकी डिझायरची विक्री वार्षिक आधारावर सुमारे ५ टक्क्यांनी घटली आहे. एप्रिल २०२३ मध्ये, मारुती सुझुकीने डिझायरच्या १०,१३२ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये, डिझायरच्या १०,७०१ युनिट्सची विक्री झाली होती. विक्रीत ही ५ टक्क्यांची घसरण झाली नसती तर एप्रिल महिन्यातही टॉप-१० विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत त्याचा समावेश नक्कीच झाला असता.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

(हे ही वाचा : देशात दाखल झाली ८ गिअर असलेली ‘सुपरफास्ट’ Sporty SUV कार, ४.९ सेंकदात १००KM स्पीड, ५ लाख देऊन होईल तुमची)

Maruti Suzuki Dzire इंजिन आणि ट्रान्समिशन

Maruti Suzuki Dzire मध्ये कंपनीने ११९७cc इंजिन दिले आहे ज्यात मॅन्युअल ट्रान्समिशन जोडले गेले आहे. हे इंजिन ८८.५०bhp पॉवर आणि ११३Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकीने डिझायरसाठी २३.२६ kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Maruti Suzuki Dzire किंमत

Maruti Suzuki Dzire कारची किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी ९.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. या कारमध्ये ५ लोक बसू शकतात.

Story img Loader