Best Selling MPV: भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कार आणि स्वस्त हॅचबॅकची मागणी सर्वाधिक आहे. मारुती सुझुकी बलेनो ही गेल्या महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. त्याची १८ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्विफ्ट आणि तिसऱ्या क्रमांकावर वॅगनआर आहे. यानंतर एसयूव्ही कारने टॉप दहाच्या यादीत आपले स्थान निर्माण केले. हॅचबॅक आणि एसयूव्ही व्यतिरिक्त, ग्राहकांना सात सीटर कार देखील खूप आवडतात. मारुती एर्टिगा ही बर्‍याचदा सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही आहे. मे महिन्यात त्याची विक्री कमी झाली असेल, पण तरीही या कारनं बाकीच्या गाड्यांना चांगल्या फरकाने मागे टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशात ‘या’ सात सीटर कारचा बोलबाला

  • गेल्या महिन्यात, मारुती सुझुकी एर्टिगा एकूण कार विक्रीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे, ती MPV विभागामध्ये अव्वल आहे. गेल्या महिन्यात १०,५२८ युनिट्सची विक्री झाली आहे. मे २०२२ मध्ये एर्टिगाच्या १२,२२६ युनिट्सची विक्री झाली. त्यामुळे या कारच्या विक्रीत थेट १४ टक्क्यांची घट झाली आहे. तरीही ती नंबर वन एमपीव्ही राहिली आहे.

(हे ही वाचा : Tata Punch वर पडणार भारी! देशात येतेय ६ Airbags सोबत सर्वात स्वस्त Micro SUV, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग )

  • गेल्या अनेक महिन्यांपासून, Kia Carens ची विक्री जवळपास Ertiga च्या बरोबरीची असल्याचे दिसून येत आहे. मात्र मे महिन्यात ही स्थिती नाही. मे २०२३ मध्ये, Kia Carens दुसऱ्या स्थानावर राहिली, परंतु केवळ ६,३६७ युनिट्स विकल्या गेल्या. तथापि, मे २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ४,६१२ युनिटच्या तुलनेत केरेन्सने ३८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर टोयोटा इनोव्हा २५ सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीतही स्थान मिळवू शकली नाही.

मारुती एर्टिगाचे खास वैशिष्ट्ये

मारुती एर्टिगाची किंमत ८.६४ लाख रुपये पासून सुरू होते. तर या कारच्या टॉप एन्ड व्हेरियंटची किंमत १२.९३ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. मारुती एर्टिगा १.५ लीटर पेट्रोल इंजिन (१०५PS/१३८Nm) सोबत येते. जी ५ स्पीड मॅन्यूअल आणि ४ स्पीड टॉर्क कन्वर्टर सोबत जोडले गेले आहे. हे पेट्रोल सोबत सीएनजी ऑप्शन मध्ये येते. मायलेज मध्ये पेट्रोल इंजिन १९.०१kmpl आणि सीएनजी ऑप्शन २६.०८km/kg पर्यंत मायलेज देते.