मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांच्या कार हॅचबॅक ते SUV पर्यंत प्रत्येक विभागात आहेत. ज्यामध्ये आज आम्ही MPV सेगमेंटमध्ये असलेल्या Maruti Ertiga बद्दल बोलत आहोत, जी कंपनीने अलीकडेच नवीन अपडेट्ससह बाजारात लाँच केली आहे. Maruti Ertiga LXI या MPV चे बेस मॉडेल आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती एर्टिगाच्या बेस मॉडेलची किंमत, वैशिष्ट्ये, इंजिन आणि मायलेज तसेच रोख पेमेंट तसेच फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करण्याच्या प्लॅनची माहिती सांगणार आहोत.
Maruti Ertiga LXI Price किंमत
Maruti Ertiga च्या बेस मॉडेलची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत ८,३५,००० रुपये आहे जी ऑन-रोड झाल्यानंतर ९,३६,९३५ रुपयांपर्यंत जाते. Maruti Ertiga च्या बेस मॉडेलच्या ऑन-रोड किमतीनुसार, ही MPV खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट रु.९.३७ लाख असणे आवश्यक आहे. पण जर तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल तर तुम्ही ही MPV फक्त ७०,००० रुपयांच्या डाउन पेमेंटने खरेदी करू शकाल.
(हे ही वाचा : १८,७०० रुपयांच्या बुलेटची सोशल मीडियावर चर्चा; ‘हा’ बिल पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!)
Maruti Ertiga LXI Finance Plan
जर तुमच्याकडे मारुती अर्टिगाचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी डाउन पेमेंटसाठी ७०,००० रुपये असतील, तर ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक या MPV साठी ८,६६,९३५ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जावर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.
एकदा मारुती एर्टिगाच्या बेस मॉडेलवर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला ७०,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ठरविल्यानुसार ५ वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला १८,३३५ रुपये मासिक EMI भरावे लागेल.
Maruti Ertiga LXI Engine and Transmission
मारुती एर्टिगा १४६२ सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. हे इंजिन १०१.६५ bhp पॉवर आणि १३६.८ Nm पीक टॉर्क जनरेट करते.