देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा भारतीय बाजारपेठेत मोठा दबदबा पाहायला मिळतो. मारुतीच्या कारची विक्री बाजारपेठेत धडाक्यात होत असते. भारतीय कार बाजारातील जवळजवळ प्रत्येक विभागात मारुतीचे वर्चस्व पाहायला मिळते. मग ती हॅचबॅक कार असो, सीएनजी कार असो, एसयूव्ही असो किंवा एमपीव्ही असो. आता मारुती सुझुकीच्या एका लोकप्रिय कारनं मोठा विक्रम नोंदविल्याची माहिती मारुती सुझुकीने दिली आहे. मारुती सुझुकीची एर्टिगा कार १ लाख युनिट विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान एमपीव्ही बनली आहे.

मारुती सुझुकीने Ertiga MPV च्या १ दशलक्ष (१० लाख) युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठला आहे. कंपनीने २०१२ मध्ये पहिल्यांदा Ertiga लाँच केली. २०१३ मध्ये, त्याने १ लाख युनिट्सचा विक्रीचा टप्पा गाठला, त्यानंतर २०१९ मध्ये ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला आणि २०२० मध्ये ६ लाख युनिट्सचा विक्रीचा टप्पा ओलांडला. आता २०२४ मध्ये, Ertiga ची एकूण विक्री १ दशलक्ष म्हणजे १० लाख युनिट्सवर पोहोचली आहे. यासह, MPV विभागातील त्याचा एकूण हिस्सा ३७.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

(हे ही वाचा : देशातील सर्वात लहान अन् परवडणारी इलेक्ट्रिक कार आणखी मिळणार स्वस्तात, किमतीत कंपनीने केली मोठी कपात )

मारुती एर्टिगामागील सर्वात मोठा विक्रीचे मोठे कारण म्हणजे त्याचे उत्कृष्ट मायलेज. Ertiga चे CNG व्हेरिएंट २६km/kg पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे आणि तसंच कारची किंमत देखील खूप कमी आहे. या कारची किंमत ८.३५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि १२.७९ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

या स्वस्त MPV कारमध्ये १.५-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे १०३PS आणि १३७Nm जनरेट करते. यामध्ये तुम्हाला सीएनजीचा पर्यायही देण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Ertiga मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, isofix चाइल्ड सीट अँकर आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत. तसेच, Ertiga ला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, LED टेल लॅम्प्स, १५-इंचांची चाके, ७ इंच इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते, जी Android Auto आणि CarPlay तसेच पुश-बटण स्टार्ट/स्टॉप फीचरसह येते. यातील अनेक फिचर्स टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत.