Maruti 7 Seater Car: भारतात आता ७ सीटर गाड्यांनादेखील जोरदार डिमांड आहे. ७ सीटर कारच्या विक्रीत आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी सर्वात पुढे आहे. मारुतीसोबत किआ मोटर्स, टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या कंपन्यादेखील या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचं कुटुंब मोठं आहे आणि त्यांना ७ सीटर कार खरेदी करायची आहे. थोडे दिवस थांबल्यास मार्केटमध्ये मारुती सुझुकी बाजारात मोठा धमाका करणार आहे. मारुती नवीन एमपीव्ही कार लाँच करणार आहे. ही कार महागडी असणार असून मारुतीची ही नवीन एमपीव्ही कार भारतीय बाजारात एर्टिगा आणि टोयोटाच्या इनोव्हाला टक्कर देणार असल्याची माहिती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कशी असेल मारुतीची सर्वात महागडी कार?
आपल्या सर्वांना माहित आहे की, सुझुकी आणि टोयोटा यांच्यातील करारानुसार, दोन्ही ऑटोमेकर्स त्यांचे वाहन प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर करतात. बलेनो-ग्लांझा, विटारा-हायराईडर, ब्रेझा-अर्बन क्रूझर यांसारखी अलीकडेच लाँच झालेली मॉडेल्स याची उदाहरणे आहेत. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी मारुती सुझुकी टोयोटाच्या प्रसिद्ध एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉसवर आधारित बहुउद्देशीय वाहन लाँच करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
(हे ही वाचा : काहीच दिवसांची प्रतिक्षा! Maruti आणि Honda ला टक्कर देण्यासाठी येतेय New Sedan Car, किंमत खूपच कमी )
किंमत किती असणार?
सध्या, मारुती सुझुकीच्या वाहन पोर्टफोलिओमधील मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही सर्वात महागडी कार आहे, जी कंपनी तिच्या प्रीमियम NEXA डीलरशिपद्वारे विकली जाते. या SUV ची सुरुवातीची किंमत १०.४५ लाख रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत १९.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. असे सांगितले जात आहे की मारुतीच्या आगामी MPV ची किंमत सुमारे २५ ते ३० लाख रुपये असेल आणि ती टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल. मारुतीच्या या एमपीव्हीचे उत्पादन टोयोटाच्या बेंगळुरूजवळील बिड्डी येथे असलेल्या प्लांटमध्ये केले जाईल, जिथे ग्रँड विटारा एसयूव्ही तयार केली जाते.
पॉवर, परफॉर्मन्स आणि मायलेज
कंपनी या कारमध्ये २.०-लिटर ४-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल हायब्रिड इंजिन वापरणार आहे, जे १८४bhp पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, दुसरा इंजिन पर्याय म्हणून, याला आणखी २.०-लिटर इंजिन दिले जाईल, जे १७२bhp पॉवर आणि २०५Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह बाजारात लाँच केली जाऊ शकते. मायलेजचा विचार केला तर ही कार २३.२४ kmpl चा मायलेज देईल.
(हे ही वाचा : कार घेण्याच्या विचारात आहात? Mahindra Thar वर मिळतोय तब्बल १ लाख रुपयांचा डिस्काउंट )
असेल सर्वात सुरक्षित
मारुती सुझुकीच्या या एमपीव्हीचे डिझाइन सध्याच्या इनोव्हा हायक्रॉसपेक्षा थोडे वेगळे असू शकते. नवीन डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, नवीन हेडलॅम्प आणि बंपर यामध्ये पाहायला मिळतात. एवढेच नाही तर, प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये दिलेली मारुती सुझुकीची ही पहिली कार असेल, अशी शक्यता आहे. अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि प्री-कॉलिजन सिस्टीम यासारख्या सर्व प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी कार सुसज्ज असेल.
इनोव्हा हायक्रॉसच्या धर्तीवर, मारुतीच्या या MPV मध्ये ६ एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सारखी वैशिष्ट्ये देखील दिली जाऊ शकतात. खास गोष्ट अशी आहे की ही कार सनरूफने सुसज्ज असेल, ज्यामुळे तिचा लुक आणि फीचर्स आणखी प्रीमियम होतील. कंपनी ही कार दोन सीटिंग लेआउट (७-सीटर आणि ८-सीटर) कॉन्फिगरेशनमध्ये देऊ शकते.