Maruti Jimny Car Sales: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचेकार देशभरात खूप लोकप्रिय आहेत. यातच मारुती सुझुकी जिम्नी ही कार महिंद्रा थारची स्पर्धक म्हणून ओळखली जाते. भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक जसे की, महिंद्रा थार, मारुती जिमनी दमदार एसयूव्ही गाड्या आहेत. आजच्या काळात त्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. लूक, डिझाइन आणि फीचर्समुळे लोक एसयूव्हीला पसंती देतात. त्याचबरोबर थार आणि जिम्नी या दोघांचीही क्रेझ बाजारात जास्त आहे. यंदाच्या जिमनीच्या विक्रीचे आकडे भारतीय बाजारपेठेत चांगले नव्हते, पण कालांतराने ते चांगले झाले. मात्र, देशाबाहेर जिमनीने विक्रीचा झेंडा रोवला आहे. प्रत्यक्षात गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये जिमनीच्या ४५२८ युनिट्सची विक्रमी निर्यात झाली. जुलै २०२३ मध्ये केवळ ७८ युनिट्सची निर्यात झाली. अशा प्रकारे५७०५% ची वार्षिक वाढ झाली. त्याच वेळी, निर्यात केलेल्या मॉडेल्समध्ये त्याचा बाजारातील हिस्सा ७.१३% होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा