Maruti suzuki ही एक वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. आता सुद्धा मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी एक मॉडेल लॉन्च केले आहे. या नवीन मॉडेलबद्दल आपण अधिक माहिती जसे की त्याची किंमत , फीचर्स , मायलेजबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेमध्ये आपली सेडान मारुती डिझायरची नवीन Suzuki Tour S लॉन्च केली आहे. हे मॉडेल म्हणजे मारुती डिझायरचे टॅक्सीचे मोड आहे. जे या आधीही भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होते. मात्र आता तेच मॉडेल नवीन डिझाईनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या नवीन अपडेटेड सेडानमध्ये नवीन डिझाईन, चांगले इंटिरिअर आणि मोठ्या प्रमाणात बूट स्पेस मिळते.
इंजिन आणि मायलेज
मारुती डिझायरच्या या सेडानमध्ये १.२ लिटरचे इंजिन कंपनीकडून देण्यात आले आहे. जे पेट्रोल मोडमध्ये 66kW ची जास्तीत जास्त शक्ती आणि CNG मोडमध्ये 57kW पॉवर जनरेट करते.. पेट्रोल मोडमध्ये ११३ NM आणि सीएनजीमध्ये ९८.५NM इतके टॉर्क आउटपुट आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये हे मॉडेल २३.१५ किमी तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये हे मॉडेल ३२.१२ किमीचे मायलेज देते.
काय आहेत सेफ्टी फीचर्स
पाचव्या जनरेशनमधील HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असणाऱ्या या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आली असून ग्राहकांच्या सुरक्षितेतची काळजी घेण्यात आली आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) आणि ब्रेक असिस्ट (BA), स्पीड लिमिटिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्जसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ही सेफ्टी फीचर्स येतात. कारच्या आतील भागात टिल्ट अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, फ्रंट ऍक्सेसरी सॉकेट्स, ISOFIX सीट अँकरेज आणि स्पीड-सेन्सिटिव्ह डोअर लॉकिंग सिस्टीम अशी सेफ्टी फीचर्स येतात.
हेही वाचा : भारतात आता E-Vehicles स्वस्त होणार? जम्मू-काश्मीरमध्ये सापडले लिथियमचे साठे
Suzuki Tour S ची किंमत
Suzuki Tour S ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरिएंटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये पेट्रोल इंजिनसोबत फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये पेट्रोल व्हेरिएंट असणाऱ्या मॉडेलची किंमत ही ६.५१ लाख रुपये आहे. तसेच सीएनजी व्हेरिएंटच्या मॉडेलची किंमत ही ७.३६ लाख इतकी आहे.