Maruti Suzuki या वाहन उतपादन कंपनीने Ignis, Baleno, Ciaz, XL6 साठी नेक्सा ब्लॅक एडिशन अधिकृतपणे भारतात लाँच केली आहे. Nexa ने प्रीमियम ऑफरसह हे लाँचिंग केले आहे. हे मॉडेल आता पर्ल मिडनाईट ब्लॅक शेडमध्ये आणि प्रीमियम मेटॅलिक ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. मारुती सुझुकी नेक्सा ब्लॅक एडिशन मध्ये कंपनीने नवीन रंग आणि मर्यादित एडिशन ऍक्सेसरी पॅकेजेस देखील आणले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकी नेक्सा ब्लॅक एडिशन ignis Zeta आणि अल्फा व्हेरियंटमध्ये, XL6 च्या Alpha आणि Alpha+ प्रकारांमध्ये, Zeta, Zeta+, ग्रँड विटाराच्या अल्फा आणि Alpha+ प्रकारांमध्ये आणि Ciaz च्या पोर्टफोलिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व नेक्सा कार या मर्यादित एडिशन ऍक्सेसरी पॅकेजेस ब्रँडनुसार विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Auto Expo 2023: एमजी मोटर इंडिया लाँच करणार इलेक्ट्रिक हॅचबॅक कार

या नवीन एडिशनमध्ये अंडरबॉडी स्पॉयलर , गार्निश बंपर , ३डी मॅट , गार्निश नंबर प्लेट , व्हॅक्यूम क्लिनर, सीट आणि स्टीयरिंग कव्हर्स, क्लॅडिंग, चार्जर, डोअर व्हिझर, इंटीरियर स्टाइलिंग किट, बॉडी साइड मोल्डिंग, लोगो लाइट, विंडो फ्रेम किट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti nexa black edition launched in india with new features along with limited accessories tmb 01